krushi-salla: पिकांचे वादळी वाऱ्यापासून संरक्षण कसे करावे?
krushi-salla: मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील हवामानात अनेक बदल होत असून हवामान विभागाने आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार १५ एप्रिल रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामानाचा अंदाज आणि प्रभाव:
नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये १३ व १४ एप्रिल रोजी वादळी वारा (३०-४० कि.मी./तास वेगाने), मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट आणि नंतर थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.
कृषी सल्ला:
1. ऊस पीक:
– आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
– खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
– खोड किडीवर नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस २०% (२५ मि.ली.) किंवा क्लोरेंट्रानोलीप्रोल १८.५% (४ मि.ली.) प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
– पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३०% (३६ मि.ली.) प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी.
2. हळद पीक:
– काढणी करून सुरक्षित गोदामात साठवणूक करावी.
– उकडणे, वाळवणे ही कामे हवामानाचा अंदाज पाहून करावीत.
3. तीळ पीक:
– मध्यम जमिनीत ८-१० दिवसांनी आणि भारी जमिनीत १२-१५ दिवसांनी सिंचन करावे.
– रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
4. फळबाग व्यवस्थापन:
– संत्रा/मोसंबी फळांची काढणी करावी.
– पाणी सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे.
– ००:५२:३४ (१५ ग्रॅम) + झिंक (५ ग्रॅम) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
– वादळी वाऱ्यामुळे पडलेली फळे नष्ट करावीत, मोडलेल्या फांद्या छाटाव्यात.
– लहान झाडांना काठीने आधार द्यावा.
5. भाजीपाला:
– काढणीस तयार भाजीपाला त्वरित काढावा.
– रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५१% + फेनप्रोपाचीन २५% (१० मि.ली.) किंवा डायमेथोएट ३०% (१३ मि.ली.) प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी.
– वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.
6. फुलशेती:
– खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
– काढणीस तयार फुलांची काढणी करावी.
7. तुती रेशीम उद्योग:
– ७-८ दिवसांनी (हलकी जमीन) आणि १०-१२ दिवसांनी (भारी जमीन) सिंचन करावे.
– ठिबक सिंचन वापरत असल्यास ५ तास दररोज पुरेसे आहे.
– पाणी उपलब्ध नसल्यास उन्हाळ्यात संगोपन टाळावे आणि विश्रांती दिली जावी.
वादळी वाऱ्यांचा आणि अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेता, पिकांचे आणि बागायतींचे योग्य नियोजन अत्यावश्यक आहे. हवामानाचा अचूक अंदाज आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी योग्य पावले उचलल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. krushi-salla
हे पण वाचा : कृषी सिंचनात मोठा बदल, प्रधानमंत्री योजनेने मिळणार आधुनिक सुविधा…