बाजरी पिकात अधिक उत्पादन देणारे सुधारित व संकरित वाण कोणते? वाचा सविस्तर

बाजरी पिकात अधिक उत्पादन देणारे सुधारित व संकरित वाण कोणते? वाचा सविस्तर

बाजरी पिकात अधिक उत्पादन देणारे सुधारित व संकरित वाण कोणते? वाचा सविस्तर

 

बाजरी हे कमी कालावधीमध्ये तयार होणारे, पाण्याचा ताण सहन करू शकणारे आणि आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरणारे पीक आहे. महाराष्ट्रातील हलक्या ते मध्यम जमिनीत बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारत हा बाजरीच्या उत्पादनात जागतिक स्तरावर सर्वात मोठा उत्पादक असून, त्याचा ४२ टक्के वाटा आहे.

बाजरीचे विविध सुधारित आणि संकरित वाण उपलब्ध असून, या वाणांच्या निवडीमुळे शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ आणि रोगप्रतिबंधक क्षमताही मिळते. चला तर मग, बाजरीचे काही महत्वाचे सुधारित वाण सविस्तर पाहूया.

सुधारित वाण
१) फुले आदिशक्ती
• पिकाचा कालावधी: ८० ते ८५ दिवस

• उत्पादन क्षमता: ३२ ते ३४ क्विंटल/हेक्टरी

• वैशिष्ट्ये: कणीस घट्ट, दाणे ठोकळ, गोलाकार व राखी रंगाचे, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, बीजोत्पादनासाठी फायदेशीर.

 

२) फुले महाशक्ती
• पिकाचा कालावधी: ८५ ते ९० दिवस

• उत्पादन क्षमता: २८ ते ३० क्विंटल/हेक्टरी

• वैशिष्ट्ये: कणीस घट्ट, दाणे ठोकळ, गोलाकार व राखी रंगाचे, अधिक लोहयुक्त, गोसावी रोगास प्रतिकारक्षम.

 

३) एबीएच-१२००
• पिकाचा कालावधी: ८० ते ८५ दिवस

• उत्पादन क्षमता: ३२ ते ३५ क्विंटल/हेक्टरी

• वैशिष्ट्ये: अधिक लोहयुक्त, कणीस घट्ट, दाणे ठोकळ, गोलाकार राखी रंगाचे.

 

४) एबीएच-१२६९
• पिकाचा कालावधी: ८५ ते ८८ दिवस

• उत्पादन क्षमता: ३३ ते ३५ क्विंटल/हेक्टरी

• वैशिष्ट्ये: अधिक लोहयुक्त, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, कणीस घट्ट, दाणे टपोरे.

 

संकरित वाण
१) धनशक्ती
• पिकाचा कालावधी: ७४ ते ७८ दिवस

• उत्पादन क्षमता: १९ ते २२ क्विंटल/हेक्टरी

• वैशिष्ट्ये: कणीस घट्ट, दाणे टपोरे व राखी रंगाचे, लोहाचे प्रमाण अधिक, गोसावी रोगास प्रतिकारक्षम.

 

२) समृद्धि (एआयएम पी-९२९०१)
• पिकाचा कालावधी: ८५ ते ९० दिवस

• उत्पादन क्षमता: २० ते २५ क्विंटल/हेक्टरी

• वैशिष्ट्ये: भाकरीची गुणवत्ता उत्तम, दाण्याचा रंग हिरवा व टपोरा, केवडा रोगास प्रतिकारक, अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी योग्य.

 

३) परभणी संपदा (पीपीसी-६)
• पिकाचा कालावधी: ८५ ते ९० दिवस

• उत्पादन क्षमता: २५ ते ३० क्विंटल/हेक्टरी

• वैशिष्ट्ये: केवडा रोगास प्रतिकारक, भाकरीची गुणवत्ता उत्तम, उत्तम फुटवे, अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी योग्य.

बाजरी हा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा पर्याय आहे जो कमी कालावधीत उत्पादन देतो आणि जास्त पाण्याचा ताण सहन करू शकतो. सुधारित व संकरित वाणांच्या मदतीने उत्पादन वाढवण्यास आणि रोगांपासून संरक्षण मिळवण्यास मदत होते. त्यामुळे योग्य वाण निवडून आणि जमिनीनुसार लागवड करून शेतकरी आपला लाभ अधिकाधिक वाढवू शकतात.

 

हे पण वाचा : अतिवृष्टीत भात लागवडीसाठी फायदेशीर ठरणारी पद्धत; जाणून घ्या सविस्तर!