pend

आजचा कृषी सल्ला : निंबोळी पेंडीचे फायदे

आजचा कृषी सल्ला :

निंबोळी पेंडीचे फायदे:-

  1. शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे रानातील जमिनीतील वाळवी,हुमणी आणि ढेकूण या सारख्या किड्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण होते.
  2. वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी पासून पिकांचे संरक्षण होते. आणि पिके रोगराई ला बळी पडत नाहीत.
  3. शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे पिक वाढीस फायदा होतो त्याचबरोबर पिकाला अनेक वर्षे पर्यंत अन्नपुरवठा करत राहतात त्यामुळे इतर खतापेक्षा निंबोळी पेंड फायदेशीर ठरते.
  4. उपयुक्त असणाऱ्या जमिनीतील सूक्ष्म जिवाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. त्यामुळे शेतात निंबोळी पेंड घालावी
  5. शेतात सेंद्रिय कार्बन चे प्रमाण वाढण्यास मदत होते.
  6. शेतातील उत्पन्न वाढण्यास मदत होते. आणि शेतातील मातीची सुपीकता वाढते.
  7. निंबोळी खताच्या वापरामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते

टीप : कृपया निंबोळी पेंड वापरताना चांगल्या प्रतीची घ्यावी भेसळ युक्त वापरू नये.