एनसीसीएफ उद्यापासून कांद्याची खरेदी सुरू करणार
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत, नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही खरेदी यंत्रणेद्वारे 5 लाख टन कांद्याचा राखीव साठा खरेदी केला जाईल. प्रत्यक्षात मार्चअखेर रब्बी उन्हाळ कांद्याची आवक सुरू आहे.
मात्र, कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात एनसीसीएफ 7 मेपासून कांद्याची खरेदी सुरू करेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाचे (एनसीसीएफ) अध्यक्ष विशाल सिंग यांनी रब्बी कांदा खरेदी हंगाम-2024 च्या संदर्भात जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संघटनांच्या (एफपीओ) प्रतिनिधींशी संवाद साधला या काळात शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाखा व्यवस्थापक परीक्षित एम, जितन ग्रोवर, सागर शर्मा आदी उपस्थित होते.सिंग यांनी या वेळी कांदा खरेदीबाबत विस्तृत माहिती दिली. कांदा खरेदीमध्ये सुधारणा करून पारदर्शकता आणण्यासाठी काम सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी नव्याने ५० खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. यासह खरेदीपश्चात ७२ तासांत शेतकऱ्यांसाठी पेमेंट यंत्रणा थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पद्धतीने केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यांमध्ये केली जाईल. मात्र, ठिकाणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्याची माहिती लवकरच ट्विटरच्या माध्यमातून देण्यात येईल, असेही सिंग यांनी सांगितले.
मोदींच्या सभेमुळे कांद्याची खरेदी सुरू केली का?
‘‘गेल्या दोन महिन्यांत केंद्र सुरू न झाल्याने मोठा तोटा सहन करावा लागला. जर लवकर खरेदी सुरू केली असती तर आम्हाला फटका बसला नसता’’ असा सवाल उपस्थित कांदा उत्पादकांनी केला. यावर ‘‘केंद्रीय मंत्र्यांना सांगून पुढील वर्षी वेळेवर खरेदी सुरू करू’’ असा विश्वास सिंग यांनी दिला. ‘‘इतके दिवस खरेदी बंद होती. आता नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची प्रचार सभा होणार आहे. त्यामुळेही खरेदी सुरू केली का?’’ असाही सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.