seed

बोगस बियाणे कसे ओळखायचे? जाणून घ्या कृषी विभागाची काही मार्गदर्शक तत्त्वे.. 

बोगस बियाणे कसे ओळखायचे? जाणून घ्या कृषी विभागाची काही मार्गदर्शक तत्त्वे.. 

शासनाचा उत्पादन अथवा विक्री परवाना नसणे, बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडून प्रमाणित नसलेले बियाणे, तपासणी केल्याचा रिपोर्ट नसल्यास बियाणे अनधिकृत किंवा बोगस सल्याचे मानले जाते. बोगस बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेख नसतो. पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.

काळजी काय घ्यावी?

अधिकृत परवानाधारक कृषी विक्रेत्यांकडून बियाणे, खते खरेदी करावी. खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. देयकात पीक, वाण प्लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे नाव संपूर्ण नमूद असावे. कृषी केंद्रधारकाने पक्के बिल संपूर्ण विवरणासह न दिल्यास नजीकच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा.

सोयाबीनचे ६६ हजार ८३२ क्विंटलची बियाणे मागणी नोंदविण्यात आली. उर्वरीत लागणारे बियाणे शेतकऱ्यांकडे घरगुती पध्दतीने जतन करण्यात आलेले आहे. वाशिम जिल्ह्यात अनधिकृत बियाण्यांचा शिरकाव होणार नाही याची दक्षता म्हणून सात भरारी पथके सक्रिय ठेवण्यात आली – गणेश गिरी कृषी विकास अधिकारी, जि.प. वाशिम