सर्वात जास्त दूध देणाऱ्या देशी गाई
आपल्या देशात सर्वोत्कृष्ट गायींच्या दुधात साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी यांचा समावेश होतो.
आपण या लेख मध्ये सर्वात जास्त दूध देणाऱ्या गाईच्या जातीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
भारतात कोणते गाईचे दूध सर्वोत्तम आहे असा जर प्रश्न असेल तर?
आपण असा निष्कर्ष काढू शकतो की भारतातील सर्वोत्कृष्ट दूध देणाऱ्या जाती म्हणजे गीर, साहिवाल आणि लाल सिंधी, या गायींना त्यांच्या भरपूर दूध उत्पादनामुळे नेहमीच जास्त मागणी असते. या गायी इतर देशांमध्येही निर्यात केल्या जातात, जिथे त्यांचा वापर दूध उत्पादनासाठी केला जातो.
सर्व प्रथम आपण साहिवाल गाईची माहिती पाहू?
साहिवाल गाय हि भारतीय गोवंश असून विशेष करून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील माउंटगोमेरी येथील उत्पत्ती आहे. ही प्रजाती भारतातील दूध उत्पादनात एक नंबर स्थानावर आहे. गरम वातावरणात सहज राहणारी आणि शांत स्वभावाची गाय आहे.
या गाईचा उपयोग साधारण दोन कामासाठी होतो
- एक म्हणजे तिचे दूध व
- दुसरे म्हणजे शेतीकामासाठी या गाईचे बैल उपयुक्तअसतात
साहिवालची गाय किती दूध देते व रंग वजन?
रोज हि गाय 7 ते 10 लिटर देते
या गाईचा रंग तपकिरी लाल ते राखाडी लाल असा असतो
या गाईचे वजन साधारण 600kg उंची 114 ते 127 सेमी सरासरी असते.
साहिवाल गाय प्रसिद्ध का आहे?
साहिवाल ही भारत आणि पाकिस्तानमधील सर्वोत्तम जातींपैकी एक आहे. हे टिक-प्रतिरोधक, उष्णता-सहिष्णु आहे आणि अंतर्गत आणि बाह्य दोन्ही परजीवींच्या उच्च प्रतिकारासाठी प्रख्यात आहे . वासरू दुग्धपान करताना गायींना दुग्धपान करताना सरासरी 2270 किलो दूध मिळते आणि त्याहून अधिक दूध उत्पादनाची नोंद झाली आहे.
गीर गाय
गीर गाय हा एक भारतीय गाय असून उत्तर भारतात, विशेष करून गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. या गाईची दूध देण्याची क्षमता २०-२५ लिटर दिवस आहे. ब्राझीलमध्ये या गाईचे संवर्धन करून दूध देण्याची क्षमता ४०-५० लिटर प्रतिदिन पर्यंत वाढवलेली आहे. अमेरिकेतील ब्राह्मण गायीच्या निर्मितीतील ही एक प्रजाती आहे.
गीर गायीच्या दुधापासून जास्त तर तूप तयार केले जाते
गीर गाईच्या तूपाचे काय फायदे आहेत?
- बुद्धीची क्षमता वाढवण्यास मदत होते
- प्रतिकारशक्ती निर्माण करणे
- त्वचेची काळजी घेते
- निरोगी वजन व्यवस्थापन
- पचन सुधारते अंगभूत ब्युटीरेट एनीमा आणि शुद्ध गीर गाईच्या तुपाच्या तोंडी ब्युटीरेटमुळे पचन सुधारते आणि पचनसंस्थेशी संबंधित इतर समस्या दूर होण्यास मदत होते
गिर गाय दिवसाला किती दुध देते?
गीर गाईची दूध देण्याची क्षमता २०-२५ लिटर आहे
महाराष्ट्रात गीर गायीची किंमत किती आहे?
साधारण किंमत: 39000 रुपये.
राठी गाय
राठी किंवा राठ हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः राजस्थान मध्ये आढळतो. बहुतेक ठिकाणी राठी आणि राठ असे दोन वेगवेगळे उपप्रकार असेल हि म्हणतात. हा गोवंश राजस्थान मधील बिकानेर जिल्ह्यातील राठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रांतात मोठ्या प्रमाणात आढळतो.
अनेकजण या गायीचे दूध पिण्यालासाठी वापरतात. तर या दुधात प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी असे 12 प्रकारचे पोषक घटक असतात. गायीच्या दुधाचे सेवन केल्याने हाडांना मजबुती मिळते. तसेच ते स्नायूंच्या वाढीसाठी देखील फायदेशीर ठरतात.
हि गाय एका दिवसात 15 ते 20 लिटर दूध देते.
थारपारकर गाय
थारपारकर गाय हा एक भारतीय गोवंश असून सिंध, पाकिस्तान मधील थारपारकर जिल्ह्यात हिचा उगम झाला. हिला थार, राखाडी सिंधी, पांढरी सिंधी, मालानी या नावाने पण ओळखले जाते. हा गोवंश पाकिस्तान, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.
थारपारकर गायीचे दूध आरोग्यासाठी चांगले आहे का?
थारपारकर गायीच्या दुधात उच्च पौष्टिक मूल्य आहे. दुधात सरासरी ४.४% फॅट आणि ९.०% SNF असते. ते हवामान, पर्यावरणीय परिस्थितीची कठोरता सहन करू शकतात. हे अनेक उष्णकटिबंधीय रोगांना प्रतिरोधक आहेत.
लाल सिंधी
लाल सिंधी गाईचा रंग गडद लालसर तपकिरी ते पिवळसर लाल रंगाचा असतो परंतु सामान्यत: तो गडद लाल असतो. ते सिंध, थारपारकर किंवा सफेद सिंधीच्या इतर दुग्ध प्रजातींपेक्षा भिन्न आहेत. रंग आणि देखावा या दोन्ही रंगात लाल सिंधी अधिकच गोलाकार असून लहान वक्र शिंगे व उंच असते.
लाल शिंधी गाय साधारण दररोज 12 लिटर देते.
हे हि पहा : Budget : केंद्रीय अर्थसंकल्प 2024…