पावसाच्या पार्श्वभूमीवर शेती सल्ला: कोणती पिके आणि कधी पेरणी? वाचा सविस्तर!
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील काही दिवसांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य पूर्वतयारी करणे अत्यंत आवश्यक आहे.
हवामानाचा अंदाज
• २९ मे ते ३१ मे: तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता.
• ३० मे ते ५ जून: सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि तापमानात घट होण्याचा अंदाज.
महत्त्वाचा संदेश
• हा पाऊस पूर्वमोसमी आहे, त्यामुळे पेरणीची घाई करू नका.
• काढणीस तयार असलेली पीक व्यवस्थित साठवा, पावसात भिजणार नाही याची काळजी घ्या.
पीक व्यवस्थापन सल्ला
कापूस
• नांगरणी नंतर मोगडणी करा.
• मोगडणीनंतर २-३ वखराच्या पाळ्या द्या.
• शेवटच्या वखरणीपूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी ५ टन आणि बागायती लागवडीसाठी १० टन चांगले कुजलेले शेणखत पसरवा.
• जमिन, हवामान आणि वाणांची निवड काळजीपूर्वक करा.
तूर
• पूर्व मशागतीसाठी वखराच्या २-३ पाळ्या द्या.
• शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत मिसळा.
• वापरासाठी बीडीएन-2013-41, बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीएसएमआर-853, बीडीएन-716, बीडीएन-2, बीडीएन-708, एकेटी 8811, पीकेव्ही तारा, आयसीपीएल 87119 वाणांचा वापर करा.
• पावसाळ्यात फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी शेताभोवती ३ फूट खोल आणि २ फूट रुंद चर काढा.
मुग/उडीद
• लागवडीसाठी कुळवाच्या २ पाळ्या द्या.
• शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत मिसळा.
• मुग पिकासाठी कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, बीएम-2002-1, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 वाण वापरा.
• उडीदसाठी बीडीयु-1, टीएयू-1, टीपीयू-4 वाण वापरावेत.
भुईमूग
• वखराच्या २-३ पाळ्या द्या.
• शेणखत/कंपोस्ट खत १० गाड्या प्रति हेक्टरी पसरवा.
• वापरासाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2, टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123 वाण निवडा.
मका
• वखराच्या १-२ पाळ्या द्या.
• नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, युवराज वाण वापरा.
फळबाग सल्ला
• केळी / आंबा / सिताफळ: लागवडीपूर्वी शेणखत आणि सुपर फॉस्फेट वापरून खड्डे भरा. लहान झाडांना वादळापासून आधार द्या.
• द्राक्ष: रोगग्रस्त पाने काढून फवारणी करा.
भाजीपाला व फुलशेती
• पूर्व मशागत करून घ्या.
• काढणीस तयार पीक वेळेवर काढा.
• जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे पीक सुरक्षित ठिकाणी साठवा.
पशुधन सल्ला
• वादळी वाऱ्यामुळे जनावरे घरात ठेवा.
• पावसापासून संरक्षणासाठी निवाऱ्याची व्यवस्था करा.
• स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध ठेवा.
शेतकऱ्यांनी या सल्ल्यांचे पालन करून हवामान बदलामुळे होणाऱ्या संकटांना तोंड द्यावे व आपली शेती सुरक्षित ठेवावी. यामुळे शेतकरी आत्मनिर्भर आणि टिकाऊ शेतीकडे वाटचाल करू शकतील.
हे पण वाचा : खरीप पेरणीसाठी १००% अनुदानावर बियाणे; जाणून घ्या लाभ कसा घ्यायचा!