नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वातीन कोटींची मदत

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वातीन कोटींची मदत

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वातीन कोटींची मदत खात्यात वर्ग केली जात आहे 

शिरूर तालुक्यातील बेटभागासह पश्चिम पट्ट्यातील 14 गावांमध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांची 3 कोटी 22 लाख रुपयाची मदत शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात येत असुन सर्वांने खाते केवायसी करून घ्यावे असे आवाहन तहशिलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे .

28 डिसेंबर 2023 रोजी बेटाच्या क्षेत्रासह तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. मुसळधार पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांसह पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

या मधे टाकळी हाजी, साबळेवाडी, माळवाडी, कवठे येमाई, मुंजाळवाडी, खैरेनगर, सविंदणे ,पाबळ , केंदुर, फाकटे, काठापुर , इचकेवाडी ,कान्हुर मेसाई ,वाघाळे या परीसरातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळझाडाचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले होते .

यावेळी, प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली आणि त्यानुसार, प्रांतीय अधिकारी हरीश सुल आणि तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी तातडीने आदेश देत कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील पिकाचे प्रत्यक्ष पंचनामे केले.

यामध्ये एकूण दोन हजार सातशे सात शेतकऱ्यांचा समावेश होता. या संदर्भात तहसीलदार बालासाहेब मस्के म्हणाले की, पंचनाम्यानुसार नुकसान झालेल्या 2 हजार 707 शेतकऱ्यांना 3 कोटी 22 लाख 20 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि प्रत्येकाच्या खात्यात हस्तांतरित केली जात आहे.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com