कांदा काढणी, मान पाडणे, साठवणूक, वजन घट, पाणी व्यवस्थापन, सूक्ष्मजीव संक्रमण, पात कापणे

कांदा काढणी व साठवणीदरम्यान वजन घट होऊ नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स

कांदा काढणी व साठवणीदरम्यान वजन घट होऊ नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स

 

कांद्याच्या योग्य काढणी आणि साठवणीमुळे त्याचे वजन आणि गुणवत्ता कायम राहते. जर कांदा योग्य प्रकारे न कापता त्याचे तोंड उघडे ठेवले तर त्याला नाश करणारे जीवाणू लवकर शिरू शकतात, त्यामुळे तो सडू लागतो किंवा त्याचे वजन कमी होते.

 

महत्त्वाचे टप्पे:
1. कांदा काढणीची वेळ:
• कांदा लागवडीनंतर १००-११० दिवसांत काढणीस तयार होतो.
• नवीन पात येणे थांबते, आणि कांद्याच्या वरच्या पातीचा भाग वाळतो.
• ५०% कांद्यांची माने पडल्यावर काढणी सुरू करावी.

 

2. पाणी व्यवस्थापन:
• कांदा काढणीपूर्वी तीन आठवडे पाणी तोडणे आवश्यक असते, जेणेकरून कांदा योग्यरित्या वाळेल.

 

3. योग्य पद्धतीने पात कापणे:
• कांदा काढल्यानंतर त्याला शेतात वाळवून घ्यावे.
• नंतर कांद्याच्या मानेला पीळ देऊन ३-५ से.मी. (१-१.५ इंच) मान ठेऊन पात कापावी.
• असे केल्यास कांद्याचे तोंड पूर्णपणे बंद राहते आणि तो सूक्ष्मजीव संक्रमण, पाणी बाष्पीभवन आणि मोड येणे यापासून सुरक्षित राहतो.

 

अपायकारक पद्धती:
जर कांद्याची मान पूर्णपणे कापली आणि त्याचे तोंड उघडे राहिले, तर तो लवकर सडतो.
तसेच, कांद्याचे पाणी बाष्पीभवन होऊन त्याचे वजन कमी होते आणि तो दीर्घकाल टिकत नाही.
अशा वेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

 

कांद्याची योग्य प्रकारे काढणी आणि साठवणूक करणे महत्त्वाचे आहे. पात पूर्ण न कापता, योग्य लांबीची मान ठेवल्यास कांदा जास्त काळ टिकतो आणि वजन घट होत नाही.

 

हे पा वाचा : ऊस पिकाचे पाणी व्यवस्थापन: भरघोस उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान!

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com