weather

पुढील तीन दिवस कसं राहील हवामान, राज्यात खरंच पावसाची शक्यता आहे का? पंजाबराव डख नेमकं काय म्हणाले?

राज्याच्या हवामानात बदल (Climate change) होत आहे. सध्या राज्यात (state) पावसासाठी (Rain) पोषक वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली. मान्सून (Mansoon) सध्या अंदमानच्या (andaman) बेटावर दाखल झाला आहे. तर पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रासह कोकण विभागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिला. उर्वरीत ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख म्हणाले.

1, 2 आणि 3 जूनला महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 आणि 31 मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर  1, 2 आणि 3 जून रोजी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. राज्यात मान्सूनची परिस्थिती चांगली आहे. महाराष्ट्रात 8 जूनला मान्सून सर्वत्र सक्रिय होईल असे पंजाबराव डख म्हणाले.

पेरणीच्या दृष्टीनं पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सल्ला

पेरणीच्या दृष्टीनं पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. जोपर्यंत पावसाची एक वीत ओल जमिनीत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे. सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याचे पंजाबराव डख म्हणाले.

23 मे ते 26 मे दरम्यान विदर्भात कडक ऊन राहणार

राज्यात एकीकडे उष्णतेचा पारा वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातलाय. अशातच विदर्भात अवकाळी पावसाने गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकला असतानाच आता उष्णतेची लाटेचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आलाय.

विदर्भातील अकोला येथे दिनांक 23 मे ते 26 मे दरम्यान पुढील चार दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. तसेच 23 मे पासून पूढील 48 तास विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि अमरावतीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, तसेच 30 ते 40 किमी प्रतितास सोसाट्याचा वाऱ्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट  जाहीर करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये वादळी वारा विजांसह मुसळधार पाऊस

दरम्यान, आजही काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान होत आहे.  बार्शी शहरात मुसळधार पावसामुळे फळबागा धोक्यात आल्याची माहिती मिळत आहे. दुपारनंतर बार्शीतील वातावरणात अचानक बदल झाला. यानंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्या आहेत.

 

अशाच माहितीसाठी ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 

ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप