आता शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा उपयोग होणार

आता शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा उपयोग होणार 

आता शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा उपयोग होणार – AI Technology

उसाचे उत्पादन वाढवण्याचे सर्वात मोठे आव्हान महाराष्ट्रातील शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोर आहे. बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने जागतिक संस्थांच्या सहयोगाने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञानामुळे केवळ उत्पादकताच नव्हे, तर साखर उताऱ्यातही लक्षणीय वाढ करणे शक्य होणार आहे. याचा फायदा शेतकरी आणि ग्राहकांना होणार आहे.

या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक क्षेत्राची तपासणी करण्यासाठी आणि प्रकल्पाची माहिती देण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या ऊस विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित केले जात आहे. राज्यात सरासरी ऊस उत्पादन केवळ 36.6 टन प्रति एकर आहे, तर उसाच्या खोडाचे उत्पादन 27.21 टन आहे. 

या समस्येवर मात करण्यासाठी बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट, ऑक्स्फर्ड विद्यापीठ व अॅग्री पायलट एआय या जागतिक संस्थांच्या सहयोगाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञान विकसित केले आहे.

उत्पादकता वाढ, उत्पादन खर्चात बचत व साखर उत्ताऱ्यात वाढ करणे त्यामुळे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी केलेले प्रक्षेत्र संस्थेच्या शिवारात संबंधितांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.पहिल्या टप्प्यात 500 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे ट्रस्टने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हे तंत्रज्ञान साखर कारखान्यांच्या ऊस विकास विभागांसाठीही खुले केले जाईल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (ए. आय.) आधारित एक दिवसाचा विनामूल्य उपक्रम बारामतीमध्ये सुरू केला जाईल, ज्यामध्ये क्षेत्रीय भेटी, चर्चा आणि तज्ञांच्या शंका-मांडणी सत्रांचा समावेश असेल.

इच्छुक कारखान्यांच्या ऊस विकास विभागांनी ३० मार्चपर्यंत आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. नोंदणी करणाऱ्यांनाच या उपक्रमात सहभागी होता येईल. नोंदणीसाठी संपर्क – ९३०९२४५६४६.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com