आज राज्यातील या भागात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
राज्यात आज ढगाळ वातावरणामुळे सकाळी गारवा पसरला होता. तर दुपारी उकाड्यासोबत उन्हाचा चटकाही जाणवत आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यात आज हवामान विभागानं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीनं हजेरी लावली. तर आज विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे.
मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड तसेच जळगाव आणि अहमदनगरमध्ये ढगाळ हवामान राहील. आणि उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.
सध्या रब्बीतील पीक काढणी चालू आहे. पण त्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याचसोबत उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.
त्यामुळं जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये १८ ते २० फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये १९ ते २० फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे.