सरकार शेतीमालाच्या भावाची गॅरंटी देणार का? विरोधकांच्या हल्ल्यानंतर MSP बाबत काय म्हणाले कृषी मंत्री
समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी किमान आधारभूत किंमतीविषयीचा कायद्यावरुन सरकारला कोंडीत पकडले. 12 जुलै 2020 रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागणीसंबंधी समितीच्या बैठकींविषयी प्रश्न केला होता. शिवराजसिंह चौहान यांनी समितीच्या 22 बैठकी झाल्याचे स्पष्ट केले. समितीच्या शिफारशींवर विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
खतासाठी कोट्यवधीची सबसिडी
यावेळी शिवराजसिंह चौहान यांनी सरकार खतावर 1 लाख 68 हजार कोटी रुपयांची सबसिडी देत असल्याची माहिती दिली. सरकार अजून मोठे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तूर, मसूर, उडीद या डाळींचे जितके उत्पादन होईल, सरकार ते सर्व खरेदी करण्यास तयार असल्याचे कृषीमंत्री म्हणाले. पण विरोधकांनी MSP कायद्यावर सरकारला पेचात टाकले. विरोधकांनी एकच गोंधळ सुरु केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक सुरु होती. एमएसपी कायद्यासाठी विरोधक आक्रमक दिसले. यापूर्वी पण शेतकऱ्यांनी वाघा बॉर्डरवर सरकारची मोठी दमकोंडी केली होती. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवलेली आहे.