गव्हाचे दर 53% वाढले… पुढे काय?

गव्हाचे दर 53% वाढले… पुढे काय?

 

Wheat Price : केंद्रीय अन्न पुरवठा आणि वितरण विभागाच्या मते, एका आठवड्यात
गव्हाच्या बाजारभावात (Gahu Bajarbhav) प्रति क्विंटल २० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गव्हाचा भाव प्रति क्विंटल २९६६ रुपये आहे, जो गेल्या डिसेंबर महिन्यापेक्षा ३.५३ टक्के जास्त आहे. जाणून घेऊयात गव्हाच्या किंमतीबद्दल आणि भविष्यात किंमती कशा असतील, याबद्दल…
गेल्या २ महिन्यांपासून किमती (Wheat Market Yard) समाधानकारक आहेत. पणन मंडळाच्या आकडेवारीनुसार, गव्हाचा सध्याचा भाव (Gahu Market) २९६६ रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला आहे, जो किमान आधारभूत किमतीपेक्षा ३० टक्के जास्त आहे. तर, तीन वर्षापूर्वीच्या तुलनेत, किंमत ५३ टक्क्यांनी वाढली आहे. व्यापार विश्लेषकांच्या मते, पुढील काही आठवडे गव्हाच्या किमती दबावात राहण्याची शक्यता आहे.

 

एका महिन्यात दरात ३ टक्के वाढ
केंद्रीय अन्न पुरवठा आणि वितरण विभागाच्या मते, एका आठवड्यात गव्हाच्या बाजारभावात प्रति क्विंटल २० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गव्हाचा भाव प्रति क्विंटल २९६६ रुपये आहे, जो गेल्या डिसेंबर महिन्यापेक्षा ३.५३ टक्के जास्त आहे. तर, गेल्या वर्षीच्या किमतींपेक्षा किमती १७ टक्क्यांनी जास्त आहेत. त्याचप्रमाणे, जर आपण ३ वर्षांपूर्वीच्या किमतींची तुलना केली तर सध्या गव्हाच्या किमतीत ५३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

 

गव्हाच्या पेरण्या ८ लाख हेक्टरने वाढल्या
२०२४-२५ च्या रब्बी हंगामात, २० जानेवारीपर्यंत, ३२० लाख हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झाली, जी गेल्या वर्षीच्या क्षेत्राच्या तुलनेत २ टक्क्यांहून अधिक आहे. तर, सामान्य पेरणीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी सुमारे ८ लाख हेक्टरवर जास्त गहू लागवड केली आहे. गव्हाची पेरणी जवळजवळ पूर्ण झाल्याचे चित्र आहे. गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाल्यामुळे, एमएसपीमध्ये प्रति क्विंटल १५० रुपये वाढ करून २४२५ रुपये प्रति क्विंटल करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

गव्हाची किंमत का वाढत आहे?
गव्हापासून बिस्किटे, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ बनवणाऱ्या एफएमसीजी कंपन्यांनी गव्हाची भरघोस खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने साठ्याची मर्यादा लागू करण्यापूर्वीही व्यापाऱ्यांकडे फारसा साठा शिल्लक नव्हता. त्याच वेळी, केंद्रासाठी गहू साठवून ठेवणारी आणि वितरित करणारी नोडल एजन्सी, एफसीआयने सरकारी साठ्यातील गहू बाजारात पुरवण्यास विलंब दर्शविला असल्याचे चित्र आहे.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com