महाराष्ट्रात गव्हाच्या दरात विक्रमी वाढ…! काय आहे कारण?
कांद्याचे दर दिवसागणिक वाढत आहेत. गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. सध्या गव्हाला 2500 ते 3900 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गहू बाजारात सरकारी हमीभावापेक्षा 25 ते 30 टक्के जास्त दराने विकला जात आहे.
सरासरी किंमत 3450 रुपये प्रति क्विंटल
अनेक बाजार समित्यांमध्ये गव्हाची सरासरी किंमत 3450 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. सरकारने चालू वर्षासाठी गव्हाची एमएसपी 2275 रुपये निश्चित केली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये गव्हाची खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे जास्त भाव मिळत आहेत.
का वाढत आहेत गव्हाचे दर?
महाराष्ट्रात नेमक्या गव्हाच्या किंमती का वाढतायेत असा प्रश्न तम्हाला पडला असेलच? तर महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन कमी होते. देशातील एकूण उत्पादनापैकी राज्यात केवळ 2% गव्हाचे उत्पादन होते. सध्या गव्हाचे दर एमएसपीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एमएसपीवर गहू विकण्यापेक्षा बाजारात गहू विकणे स्वस्त पडते.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा कल गहू लागवडीकडे
एकीकडे गव्हाचे दर वाढत आहेत तर दुसरीकडे कांद्याचे दर कमी होत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कांदाशेती सोडून देत गव्हाकडे वळत आहेत. गव्हाच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय. कारण सध्या गव्हाला अपेक्षित दर मिळत आहे.
खराब हवामानामुळे गव्हाचे नुकसान
गेल्यावर्षी पाऊस कमी होता. अनेक शेतकऱ्यांकडे शेतीसाठी पैसे नाहीत. काही शेतकरी हवामानामुळे प्रभावित झाले. या दोन्ही घटकांचा पीक उत्पादनावर मोठा परिणाम होतो. सध्या गव्हाचे उत्पादन कमी झाले आहे आणि मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे.