भाव

कापूस, सोयाबीन, लिंबू तसेच गव्हाचा सध्याचा भाव काय आहे?

कापूस, सोयाबीन, लिंबू तसेच गव्हाचा सध्याचा भाव काय आहे?

देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे दर सातत्याने वाढत आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची सरासरी किंमत 4,400 ते 4,600 रुपये प्रति क्विंटल आहे. दुसरीकडे, आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर कमी झाले होते. देशातील सोयाबीन बाजारातही चढउतार दिसतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव 

कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उचार सुरुच आहेत. तर बाजार समित्यांमधील भावपातळी कायम दिसते. बाजार समित्यांमधील कापसाची आवक मात्र कमी होत आहे. काल कापसाची आवक ५३ हजार ६०० हजार गाठींच्या दरम्यान होती. तर बाजारभाव सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव दोन दिवसांपासून काहीसे स्थिरावले आहेत. देशातील बाजारातही कापसाचे भाव आणखी काही दिवस स्थिर दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आजचे कापूस बाजारभाव 

आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसतो. बाजारात आवकही वाढत नाही. दुसरीकडे, लग्न आणि सणांमुळे आल्याला चांगली किंमत मिळत आहे. सध्या आल्याचा सरासरी भाव 7 हजार ते 11 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. ही स्थिती अजून काही दिवस टिकू शकते. त्याच वेळी, भविष्यात बाजारात आवक कमी झाल्यानंतर दराला काही प्रमाणात पाठबळ मिळेल असा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत.

आजचे आले बाजारभाव 

देशातील उत्पादन घटीचा अंदाज आणि बाजारातील सरासरीपेक्षा कमी आवक, यामुळे गव्हाचे दर स्थिर राहिले आहेत. काही बाजारपेठांमध्ये गव्हाच्या दरात गेल्या महिन्याभरात सुधारणा झाली आहे. उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर ही सुधारणा दिसून आली. सध्या देशात गव्हाची सरासरी किंमत 2300 ते 2800 रुपये प्रति क्विंटल आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, गव्हाचे दर पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे.

आजचे गहू बाजारभाव 

वाढत्या उन्हामुळे लिंबुला चांगली मागणी आहे. पण दुसरीकडे, वाढती उष्णता आणि पाण्याच्या कमतरतेमुळे लिंबाच्या पिकाला चांगला फटका बसला आहे. दुष्काळामुळे उत्पादनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारातील लिंबू आवक घटली परिणामी, लिंबाला चांगला भाव मिळत आहे. सध्या लिंबाला गुणवत्तेनुसार 6 हजार ते 9 हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. लिंबुचे भाव पुढील काळात आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

आजचे लिंबू बाजारभाव 

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com