Weather forecast : आजचा हवामान अंदाज : 31 जानेवारी 2024

Weather forecast : आजचा हवामान अंदाज : 31 जानेवारी 2024

Weather forecast : आजचा हवामान अंदाज : 31 जानेवारी 2024

राज्यातील सर्वात मी किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. राज्यातील परिस्थिती आजही गंभीर आहे. राज्यात किमान तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये राज्यातील सर्वात कमी किमान तापमान 9.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाली आहे. (मंगळवार) बिहारमधील मोतिहारीमध्ये देशातील मैदानी भागात सर्वात कमी किमान तापमान 5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. उत्तर भारतात थंडी, कोरडी आणि धुक्याची स्थिती होती.

उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट असूनही राज्यभर तापमानात वाढ होत आहे. (मंगळवार) निपड वगळता उर्वरित राज्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले. किमान तापमान 10 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. आज किमान तापमानात घट होण्याचा अंदाज (weather forcast) हवामान विभागाने वर्तवला आहे.

मंगळवार सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदवलेले कमाल तापमान,(अंश सेल्सिअसमध्ये) : ठिकाण : कमल तापमान (किमान तापमान)
नाशिक ३०.४ (१२.३), पुणे ३१.५ (१३.६), जळगाव ३१.८ (१०.५), कोल्हापूर ३०.७ (१७.९), महाबळेश्‍वर २६.२ (१४.७), धुळे ३१ (१०.९), सातारा ३१.२ (१५.५), सोलापूर ३३.२ (१७.४), मालेगाव ३१.४ (१४.२), निफाड ३०.५ (९.८), सांगली ३१.७ (१६.८), सांताक्रूझ ३३ (१८.४), बुलडाणा ३०.४ (१५), ब्रह्मपुरी ३३.४ (१५.८), चंद्रपूर ३१.२ (१४.४), गडचिरोली ३०.४ (१४.४), डहाणू २७.५ (१७.४), छत्रपती संभाजीनगर ३०.६ (१३.६), नांदेड ३०.६ (१७.२), परभणी ३१.४ (१५.५), अकोला ३२.४ (१५), अमरावती ३०.८ (१४.६), रत्नागिरी ३३ (१९.५), वर्धा ३१.५(१५.९), वाशीम ३२ (१३.४), गोंदिया २९.६ (१३.९), नागपूर ३०.४ (१५), यवतमाळ ३२.२ (१३.५).

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com