मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रविवारी आणि सोमवारी येलो अलर्ट जारी केला आहे.

रविवारी विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) विदर्भातील जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com