चिकट सापळ्यांची वापर कसा करावा ? | yellow sticky traps
1. सापळे शेतात पिकाच्या ओळीत झाडापासून २० सेमी दुर अंतरावर लावावे.
2. सापळे उत्तर-पूर्व (ईशान्य) व दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) दिशेनेच लावावे. जास्त प्रमाणात किटक आकर्षित होतात.
3. पिकामध्ये कीटक नियंत्रणासाठी – ३०x१५ सेंमी आकाराचे ६४ सापळे प्रति एकर याप्रमाणे आपण सोयाबीन, भुईमूंग, उडीद, कांदा चवळी, कोबी, फुलकोबी, काकडी, कोहळे इत्यादी व तत्सम उंच पिकामध्ये वापरू शकतो.
4. किंवा आपण ३०x४० सेंमी आकाराचे ३६ सापळे प्रति एकर कपाशी, वांगी, भेंडी, टोमॅटो, मिरची, संत्रा, पपई, डाळींब, द्राक्ष व तत्सम उंच पिकामध्ये वापरू शकतो.
5. जर तुम्हाला किटकांचे फक्त निरीक्षण करायचे असेल तर एकरी 13 पिवळे व 12 निळे चिकट सापळे आपण लाऊ शकता.
6. सापळे लावताना पिकाच्या ऊंची नुसार लावावेत.
7. दर दिवशी या सापळ्यांचे निरीक्षण करावे. व गरजेनुसार कीटक नाशकांच्या फवारणीचे नियोजन करावे.
8. सापळे दर 2 ते 3 महीने झाल्यावर काढून नष्ट करावेत. व त्याठिकाणी गरज असेल तर दुसरे सापळे लावावेत.
9. आंतर मशागतीचे वेळी वखरणी / डवरणी करतांना बैलांचा / औजारांचा धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.
10. पाऊस आणि वादळी वाऱ्यामध्ये ही सापळे खाली पडू नये म्हणून सापळ्यांच्या काठीला घट्ट जमिनीमध्ये खोचून बसवावे.
तुम्हाला चिकट सापळे खरेदी करायचे असतील तर खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा
8007852712
अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जोडले जा