राज्यात अवकाळीचा कहर..! पपई-केळीच्या बागा पार भुईसपाट…
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावलीय. याचा मोठा फटका शेती पिकांना बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील भंडारा (bhandara) आणि अकोला (akola) जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठे नुकसान झालंय. पपईसह केळीच्या बागा (Damage to papaya and banana) भुईसपाट झाल्या आहेत.
फळबागांसह भात आणि पालेभाज्या पिकांनाही फटका
भंडारा जिल्ह्यातील मागील तीन दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाचा फटका भातपिकांसह पालेभाजी पिकांनाही बसला आहे. यासोबतचं जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या मिरची या बागायती शेतीलाही याचा फटका बसला आहे. अवकाळी पावसानं भात पिकांसह मिरची आणि पालेभाज्याची पिकं जमिनदोस्त झाली आहेत. तर, अनेक शेतातील मिरची पीक जळून खाली पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे.
अकोल्यात शेकडो एकरावरील पपई आणि केळीच्या फळबागा भुईसपाट