उन्हाळ्यात या चारा पिकांची लागवड करा आणि मिळवा भरघोस उत्पादन!
उन्हाळी हंगामात (Summer Season) जनावरांना हिरव्या चाऱ्याची गरज असते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी हंगामात ज्वारी, बाजरी, मका, चवळी हीचाऱ्याची पिके घेऊन हिरव्या चान्यची गरज भागवता येते. या पिकांसाठी मध्यम ते भारी जमीन निवडावी. पिकास ७ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
ज्वारी, बाजरी, मका या पिकांची लागवड (Fodder Crops Lagvad) मार्चपर्यंत तर चवळीची लागवड एप्रिल महिन्यापर्यंत करावी. हिरव्या चाऱ्यासाठी या पिकांची कापणी ६० ते ७० दिवसादरम्यान करावी. ज्वारी, बाजरी, मका या पिकाचे हेक्टरी ५५० ते ६०० क्विंटल तर चवळीचे हेक्टरी ३०० ते ३५० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
– हिरव्या चाऱ्यासाठी ज्वारीच्या रुचिरा, फुले अमृता, मालदांडी (एम-३५-१), एसएसजी-५९-३, एमपी-चारी, पुसा चारी या जातींची शिफारस आहे.
– ज्वारीची पेरणी ३० सेंटीमीटर अंतरावर करावी.
– हेक्टरी ४० किलो बियाणे वापरावे. हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावा.
– यापैकी ५० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.
– बाजरीचे जायंट बाजरा, राजको बाजरा हे वाण लागवडीसाठी वापरावेत.
– पेरणी ३० सेंटीमीटर अंतरावर करावी. हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
– हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावा.
– यापैकी ३० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.
– मक्याच्या आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, विजय, गंगासफेद-२ हे वाण लागवडीसाठी वापरावेत.
– हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावा. यापैकी ५० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.
– चवळीच्या श्वेता, इसी-४२१६ किंवा यूपीसी-५२८६ यापैकी उपलब्ध वाणाची निवड करावी.
– हेक्टरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद पेरणीपूर्वी द्यावे.
हे पण वाचा : महाराष्ट्रातील फलोत्पादनात क्रांती घडवणाऱ्या डाळिंबाच्या सर्वोत्तम जातीं; वाचा सविस्तर