Tur rate : तुरीचा भाव दहा हजारावर पोहोचला

Tur rate : तुरीचा भाव दहा हजारावर पोहोचला

Tur rate : तुरीचा भाव दहा हजारावर पोहोचला

कापूस आणि सोयाबीनसारख्या प्रमुख पिकांच्या किमती घसरल्या आहेत, तर तूरच्या किंमतीत सातत्याने वाढ दिसून येत आहे. मागील आठवड्यात तुरीच्या दरात चारशे रुपयांची वाढ झाली.. गुरुवारी (ता. २५) नवीन तुरीला ८९०० ते ९७०० रुपये दर मिळाला आता दर दहा हजारांच्या पुढे गेले आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून तुरीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. उत्पादनात घट झाल्याने किंमती वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची पिके असलेल्या कापूस आणि सोयाबीनच्या दरात चढ-उत्तर कायम सुरु आहेत. दुसरीकडे तुरीचे दर दहा हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ होण्याचा कल आहे. यवतमाळ खाजगी बाजार समितीत तुरीची किंमत 8900 ते 9700 रुपये प्रति क्विंटल वर पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत तुरीचे दर आणखी वाढणार, अशी शक्यता कृषी अभ्यासकांनी वर्तविली आहे. तुरीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सर्वच बाजारांत तुरीला चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे.

कापूस, सोयाबीनला अपेक्षानुसार दर मिळाला नाही. आता तुरीला चांगले दिवस आल्याने बाजारभाव वाढले आहेत. तुरीला या हंगामातील सर्वांधिक भाव मिळाल्याचे दिसत आहे. तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

यवतमाळ खासगी बाजार समितीत 22 जानेवारीपासून तुरीच्या दरात सुधारणा होत आहे. त्याची किंमत 8500 ते 9500 रुपयांपर्यंत आहे. त्यानंतर सातत्याने तीन दिवस दर वाढतच आहेत. 23 जानेवारीला ती 8500 रुपयांवरून 9330 रुपये, 24 जानेवारीला 8700 रुपयांवरून 9595 रुपये आणि 25 जानेवारीला 8900 रुपयांवरून 9700 रुपयांपर्यंत तुरीचे दर वाढले. काही ठिकाणी याची किंमत 10,000 रुपयांवर पोहोचली आहे.

आजचे तूर बाजारभाव ➡ येथे पहा 

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com