मार्च महिन्यात तूर बाजारभाव कसा राहील

मार्च महिन्यात तूर बाजारभाव कसा राहील? सरकार काय करू शकतं?

मार्च महिन्यात तूर बाजारभाव कसा राहील? सरकार काय करू शकतं?

Tur Market : तुरीचा बाजार सध्याच्या स्थितिवरून तुरीचा भाव कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

Tur Bajarbhav : तुरीचा भाव वाढीसाठी शेतकरी शेतमाल मागं ठेऊन भाव वाढीसाठी प्रयत्न करत आहेत, तर सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. व्यापारी मात्र सावध पावलं टाकत आहेत. सरकारने व्यापारी आणि उद्योगांचे कान पिळले की बाजार काहीसा कमी होतो, पण पुन्हा वाढतो.

त्याच कारणही तसचं आहे. तुरीचा भाव आता देशभरात ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान आहे. पण बहुतांशी शेतकऱ्यांना प्रश्न पडला की या सगळ्या भानगडीत तुरीचा बाजार पुढच्या महिना, दोन महिन्यात कसा राहू शकतो? तर सध्याच्या पातळीवरून तुरीचा भाव कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

फेब्रुवारीत देशातील बहुतांशी बाजारात तुरीचा भाव ९ हजार ५०० ते १० हजार रुपयांच्या दरम्यान होता. पण सरकारने व्यापारी आणि उद्योगांना इशारा दिला. दोन आठवड्यांपुर्वी सरकारने व्यापारी आणि उद्योगांची बैठक घेतली. या बैठकीत सांगितले की तुरीचे भाव जास्त वाढायला नको.

कुणी तुरीचे भाव मद्दामून वाढवत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तुरीचा भाव ९ हजारांच्या पुढे जाऊ द्यायचा नाही आणि तूर डाळीचा भाव १५० रुपयांपेक्षा जास्त होणार नाही, हे सरकारचे उद्दीष्ट आहे. व्यापारी आणि उद्योगांनी सरकारला तुरीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही सरकारच्या वतीने करण्यात आले.

सरकारने इशारा दिल्यानंतर उत्पादन कमी असून आणि पुढील काळात तेजी दिसत असूनही उद्योग गरजेप्रमाणे खरेदी करत आहेत. यंदा तुरीचे उत्पादन घटले. सलग दुसऱ्या वर्षी उत्पादन कमी झालं. त्यामुळं तुरीचा पुरवठा कमी आहे. यामुळंच तर ऐन आवकेच्या हंगामातही तूर तेजीत आहे.

पण सरकारही निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन भाव कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. उद्योग आणि स्टाॅकीस्ट तुरीचा स्टाॅक करू शकत नाहीत. कारण आधीच तुरीवर स्टाॅक लिमिट आहे. सरकारने बाजारभावाने खरेदीचा प्रयत्न केला. पण सरकारला जास्त तूर मिळाली नाही.

हे ही पहा : शेतमाल मार्केटला विकण्यापेक्षा विका ऑनलाईन होतील हे फायदे

कारण सरकारच्या भावापेक्षा खुल्या बाजारातील भाव जास्त होते. सरकारने तूर खरेदी केली. या तुरीपासून डाळ तयार करून सरकार बाजारात विकू शकते. पण सरकारकडे तुरीचे प्रमाण कमी आहे. म्हणजेच डाळही कमीच राहील.

सरकारने ही डाळ कमी भावात विकली तरी त्याचा बाजारावर फारसा परिणाम होईल, याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळेच सरकारने व्यापारी आणि उद्योगांना वेठीस धरण्याचे धोरण सुरु केले. पण सरकारच्या याही प्रयत्नांना पूर्ण यश येईल, याची शक्यता कमीच आहे.

कारण यंदा शेतकरीही कमी भावात तूर विकताना दिसत नाहीत. त्यामुळे बाजारातील आवक कमी आहे. सध्या तुरीचा भाव ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान आहे. पुढील दोन महिन्यात तुरीचा भाव ९ हजारांपेक्षा कमी होण्याची शक्यता दिसत नाही. तर या काळातील कमाल भाव ११ ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान पोहचू शकतो.

पण भाव वाढल्यानंतर सरकार पुन्हा भाव कमी करण्यासाठी वेगळा काहीतरी फंडा वापरू शकते. मात्र बाजारातील तुरीची आवक कमी राहील्यास सरकारचे सगळे फंडे व्यर्थ जाऊ शकतात. त्यामुळे पॅनिक सेलिंग टाळून तुरीची विक्री केल्यास फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

आजचे तूर बाजारभाव पहा👇👇

तूर बाजारभाव 

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com