उद्या राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज

उद्या राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज

उद्या राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज

राज्यातील तापमानात दिवसागणिक वाढ होत आहे. अनेक ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्या (ता. 9) ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाली आहे. बुधवारी हरियाणातील कर्नाल येथे 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये किमान तापमान 4 ते 8 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. दरम्यान, बंगालच्या उपसागराच्या वायव्येस उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पोषक हवामान राहील.

 

हे ही पहा : फेब्रुवारीमध्ये थंडी सरासरीपेक्षा कमीच राहणार

राज्यभरात किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, अकोला, वाशिम आणि यवतमाळ येथे तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. किमान तापमान 11 अंश सेल्सिअस ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आज (ता. 8) तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

 

बुधवारी (ता. 7) सकाळपर्यंत 24 तासांत नोंदवलेले कमाल व किमान तापमान (°C मध्ये)
ठिकाण  कमाल तापमान (°C मध्ये) किमान तापमान (°C मध्ये)
पुणे  35.1 16.1
धुळे  32  11.5
जळगाव  33.2 14.5
कोल्हापूर  35.1 21
महाबळेश्वर  28.9 18.1
मालेगाव  35.6 16.2
नाशिक  32.9 14.8
निफाड  32.2 11.6
सांगली  35.5 20.0
सातारा 34.5 17.6
सोलापूर  37.2 20.9
सांताक्रूझ  33.5 21.1
डहाणू  29.4 20.4
रत्नागिरी  33.8
छत्रपती संभाजीनगर 33  17
नांदेड  १९.४
परभणी  ३४.६ १८.४
अकोला  ३५.१ १७.४
अमरावती  ३३.४ १७.५
बुलडाणा  ३३  १६.८
ब्रह्मपुरी  ३४.५ १८.४
चंद्रपूर  ३३.८ १७.६
गडचिरोली  ३२  १७
गोंदिया  ३२.३ १५.६
नागपूर  ३४.२ १८.६
वर्धा  ३४.५ १८
वाशीम  ३५.२ १६.४
यवतमाळ  ३५  १८.२
PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com