यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. (weather, rain, havaman)

यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

Rain update : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या तहानलेल्या शहरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी रविवारी (ता.११) हवामान विभागाने (आयएमडी) चांगली बातमी दिली आहे. प्रशांत महासागरातील उबदार पाण्याचा प्रवाह असलेल्या ‘एल निनो’ चा प्रभाव कमी होईल म्हणून देशातील नैॡत्य मोसमी पाऊस चांगला पडेल, अशी अपेक्षा वेगवेगळ्या हवामान संस्थांनी व्यक्त केली आहे.

havaman andaj : देशात मागील वर्ष, म्हणजे 2023 हे वर्ष विक्रमी सर्वात उष्ण होते. एल निनो त्या वर्षी सक्रिय होता. याचा थेट परिणाम मान्सूनवर झाला. गेल्या वर्षी बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

यामुळे उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान प्रशांत महासागरात ‘ला निना’ची स्थिती येईल, परिणामी, या वर्षीचा मान्सून चांगला असेल.

Weather : यंदा चांगला पाऊस…

युनायटेड स्टेट्सच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (एनओएए) च्या मते, एप्रिल-जूनपर्यंत एल निनो सामान्य होण्याची 79% शक्यता आहे आणि जून-ऑगस्टमध्ये ला निना विकसित होण्याची 55% शक्यता आहे.

यंदा चांगला पाऊस…

युरोपियन युनियनच्या ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’ने देखील एल निनोचा प्रभाव कमी होत असल्याची पुष्टी केली आहे. भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. डी. शिवानंद पै म्हणाले, “सध्याच्या हवामानाच्या स्थितीवर कोणतीही निश्चित टिप्पणी नाही. याचे कारण असे की काही हवामान मॉडेल ला निनाचा अंदाज वर्तवत आहेत, तर इतर म्हणत आहेत की एल निनो सामान्य असेल “.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com