उन्हाळी बाजरी व तीळ लागवड: यशस्वी नियोजनाची गुरुकिल्ली

उन्हाळी बाजरी व तीळ लागवड: यशस्वी नियोजनाची गुरुकिल्ली

 

उन्हाळी तीळ

मध्यम भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी, वालुकामय, पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओल असल्यास पीक चांगले येते.
पेरणी पेरणी ३० बाय १५ सेंमी किंवा ४५ बाय १० सेंमी अंतरावर करावी. तिळाचे बी आकाराने लहान असल्याने बी वाळू, राख, माती किंवा शेणखतामध्ये मिसळून पेरणी करावी. हेक्टरी २.५ ते ३ किलो बियाणे पुरेसे होते.

 

वाण

जे. एल. टी ४०८-२ (फुले पूर्णा), ए. के. टी.-१०१ (९० ते ९५ दिवस)

 

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास, थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम, अॅझोटोबॅक्टर व पी. एस बी. प्रत्येकी २५ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

 

उन्हाळी बाजरी
मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची १५ सें.मी. खोल नांगरणी करावी. कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी १० ते १५ गाड्या शेणखत शेतात पसरावे.

 

वाण
संकरित वाण : आदिशक्ती, फुले महाशक्ती, जेएचबी ५५८
सुधारित वाण : धनशक्ती, आयसीएमव्ही २२१

 

बीजप्रक्रिया
अरगट रोगाच्या नियंत्रणासाठी, २० टक्के मिठाच्या द्रावणाची बियाणास बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे.
गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी, प्रतिकिलो बियाणास मेटॅलॅक्झील (३५ एस डी) ६ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे चोळावे. त्यानंतर जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी
अझोस्पिरीलम किंवा अझोटोबॅक्टर २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) यांची २५ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

 

पेरणी

पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी.
पेरणी दोन चाडाच्या पाभरीने ३० बाय १५ सेंमी अंतरावर करावी. पेरणी २ ते ३ सेंमी पेक्षा जास्त खोलीवर करू नये. हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे पुरेसे होते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी विशाल कुलकर्णी, अभयराज पर…

 

खत व्यवस्थापन
पेरणी करताना नत्र, स्फुरद, पालाश प्रत्येकी ४५ किलो प्रमाणे द्यावे. उर्वरित ४५ किलो नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी खुरपणी केल्यानंतर द्यावे.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com