अजून पण नाही मिळाला 18 वा हप्ता? मग येथे थेट करा तक्रार
PM Kisan 18th installment 2024 : 5 ऑक्टोबर रोजी पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचे बटण दाबून पीएम किसान सम्मान निधी योजनेचा (PM Kisan Sammam Nidhi Yojana) 18 वा हप्ता जमा केला. त्यातंर्गत 9.4 कोटी रुपयांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्याच जमा झाले.
PM Kisan योजनेत ई-केवीआयसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. बँक खाते आधारसोबत लिंक असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असेल, त्यांना 18 व्या हप्त्याचा लाभ मिळेल.
जर तुमच्या खात्यात 18 वा हप्ता जमा झाला नसेल. 2 हजार रुपये जमा झाले नसतील. तर सर्वात अगोदर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते चेक करा.
तुमच्या बँक खात्याचा तपशील, आधार क्रमांक यासारखी माहिती व्यवस्थित आणि योग्य भरली की नाही ते तपासा. जर यात काही चूक झाली असेल तर तुमची रक्कम अटकू शकते.
pmkisan.gov.in या साईटवर “Farmers Corner” वर “Beneficiary Status” या बॉक्सवर क्लिक करा. याठिकाणी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Get Data वर क्लिक करा. तुमच्या खात्याचे स्टेट्स दिसेल.
काही चूक झाली असल्यास अथवा हप्ता जमा न झाल्यास शेतकरी हेल्पलाईन क्रमांक – 155261 वा टोल फ्री क्रमांक- 1800115526 वर कॉल करू शकतात. 011-23381092 या क्रमांकावर मदत मागू शकतात. शेतकरी pmkisan-ict@gov.in च्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात.
अशाच हवामान विषयक उपडेट रोजच्या रोज व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी खालील लिंकवरून आपला ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/LicS8Fu6gePAvHjO3WeBo9