मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी नव्या योजनांची घोषणा…

शेतकरी योजना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी नव्या योजनांची घोषणा…

आपल्या सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला थेट मार्केट देण्याचं आहे. कष्टकरी, वारकरी सुखी शेतकरी अशा प्रकारचे आपण धोरण राबवत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना अशा योजनांची आम्ही घोषणा केली, त्या योजना सुरूही केल्या. आता आम्ही ‘आमचा लाडका शेतकरी योजना’ सुरू करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बीडमध्ये राज्य सरकारने कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तर या कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली.

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येतच असते. जेव्हा नुकसान होतं तेव्हा आम्ही मदत करताना नियम बाजूला ठेऊन मदत करतो. आमच्या महायुतीच्या सरकारने लगेच मदत देण्याचं काम सुरू केलं, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

कांदा आणि दूध प्रश्नावर बैठक घेणार:

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एक रुपयामध्ये विमा योजना देणारं हे पहिलं राज्य आहे. किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्यामधून आपण मोठा निधी दिलेला आहे. आज राज्यामधील शेतकऱ्यांचा कांद्याचा आणि दुधाचा प्रश्न सोडवायचा आहे. यासाठी तुम्ही थोडा प्रयत्न करा, अशी विनंती सुद्धा एकनाथ शिंदे यांनी शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली.

आमच्या शेतकऱ्यांच्या कापसाला तसेच सोयाबिनला चांगला भाव मिळाला पाहिजे, सोयाबिनला हेक्टरी पाच हजार आणि कापसाला पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेतोय. यामध्ये दोन हेक्टर पर्यंत मर्यादा असेल, अशी घोषणा सीएम शिंदे यांनी केली.

आपण साडे सात शेतीपंपाचे वीजबिलही माफ करत आहोत, विरोधक मागच काय विचारत आहेत. आम्ही पुढचं बिल घेणार नाही. सरकार आता यापुढे शेतकऱ्यांकडून विजबिलाचे पैसे घेणार नाही, असे सुद्धा शिंदे म्हणाले.

अशाच हवामान अपडेट, दररोजचे ताजे शेतमाल बाजारभाव आणि सर्व शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रो क्रांती व्हाट्सअँप ग्रुपला जोडले जा👇

https://chat.whatsapp.com/FC6SR2CnOvV0ZuKJvhy6ut