Sale!

देशी गीर गायीचे तूप मिळेल

Original price was: 1,500.00 ₹.Current price is: 1,400.00 ₹.

देशी गीर गायीचे तूप मिळेल

आमच्याकडे देशी गीर गायीचे शुद्ध आणि उत्कृष्ट पध्दतीचे साजूक तूप उपलब्ध आहे. हे तुप A2 प्रकारच्या दुधापासून तयार केलेले आहे.घरगुती पद्धती ने कढवले आहे

वजन वाढले की अनेकजण तूप खाणे बंद करतात पण हा गैरसमज आहे. गायीच्या तूपाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. त्वचा, डोळे, हाडं यासह शरीराच्या अनेक भागांसाठी गायीचे तूप लाभदायी आहे.

गाईच्या दुध, दही, तूप, गोमुत्र आणि शेण यांना सामुहिक स्वरुपात पंचगव्य असे म्हटले जाते. आयुर्वेदामध्ये याला औषधाची मान्यता आहे. पंचगव्याचा उपयोग करून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांना मुळापासून नष्ट केले जाऊ शकते. गाईच्या तुपाला अमृत म्हटले जाते. जे तारुण्याला कायम ठेवून वृद्धपणा दूर ठेवते.

गाईच्या शुद्ध तुपाने मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होतो. शुद्ध तुपाच्या नियमित सेवनाने बळ, वीर्य व आयुष्य वाढते आणि पित्त शांत होते. अशा पद्धतीने स्त्री-पुरुष संबंधातील सर्व समस्या दूर होतात.

जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.

घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.

तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.

तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.

तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.

डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्‍या कपाळावर हलकेच मालीश करावे.

शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.

तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.

रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो.

तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.

कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे. रोज आहारात वापरले जाणारे तूप औषधी आहे

हे तुप अतिशय गुणकारी असुन लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना खुप फायदेशिर आहे.
 

खरेदीसाठी व चौकशीसाठी संपर्क करा 

 

आपले इतरही अवजारे पाहण्यासाठी खालील लिंकवर जा 

 

कृषी संबंधित उत्पादने आणि उपकरणे खरेदी आणि चौकशीसाठी कृपया माझा नंबर सेव्ह करा.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com