पाच महिने झाले, नमो शेतकरी निधीची प्रतिक्षा अखेर संपणार का..?

पाच महिने झाले, नमो शेतकरी निधीची प्रतिक्षा अखेर संपणार का..?

पाच महिन्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताच मिळालेला नाही. नमो शेतकरी निधीची शेतकशेतकरी वाट पाहत आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. त्यानुसार मागील वर्षी राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली.

त्यानंतर  योजनेचा पहिला, दुसरा हप्ता टप्प्याटप्याने दिला. त्यानंतर २८ फेब्रुवारीला केंद्र आणि राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीआधी दोन्ही एकदम हप्ते दिले.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेमध्ये राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. त्याचे तीन हप्ते आतापर्यंत देण्यात आले.

पण, जूनमध्ये पेरणीसाठी योजनेचा हप्ता मिळेल अशी आशा होती. मात्र, पाच महिने झाले, तरीही हप्ता मिळालेला नाही. राज्य सरकारतर्फे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता फेब्रुवारीनंतर मिळालेला नाही.

पेरणीसाठी शेतकऱ्यांनी उसनवारी करून, कर्ज काढून पैसे घेतले. सध्या पेरणीनंतर आंतरमशागत आणि खते, कीटकनाशके फवारणीसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरात लवकर येणे गरजेचे आहे. त्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

अशाच हवामान अपडेट, दररोजचे ताजे शेतमाल बाजारभाव आणि सर्व शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रो क्रांती व्हाट्सअँप ग्रुपला जोडले जा👇

https://chat.whatsapp.com/FC6SR2CnOvV0ZuKJvhy6ut

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com