आडसाली ऊस उत्पादन वाढीचे पंचसुत्री तंत्रज्ञान आणि खत व्यवस्थापन…

आडसाली ऊस उत्पादन वाढीचे पंचसुत्री तंत्रज्ञान आणि खत व्यवस्थापन…

आडसाली ऊस उत्पादन वाढीचे पंचसुत्री तंत्रज्ञान आणि खत व्यवस्थापन…

आडसाली ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, तसेच सुधारीत ऊस वाणांचा आणि दर्जेदार बियाण्याचा वापर, ५ फुट सरीमध्ये रोप लागवड तंत्र, ठिबक सिंचनद्वारे पाणी व खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि आंतरमशागत या पंचसुत्री तंत्रज्ञानाचा वापर केल्यास चांगले अपेक्षित उत्पादन मिळू शकेल.

आडसाली ऊसाच्या लागवडीसाठी  रासायनिक खतांचे नियोजन:

आडसाली ऊसाला हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद तसेच १७० किलो पालाशची शिफारस केली आहे. युरिया देताना निंबोळी पेंडीच्या भुकटी बरोबर ६:१ अशा प्रमाणात मिसळून द्यावीत.

आडसाली ऊसाला खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रति हेक्टर):

वेळ नत्र स्फुरद पालाश  युरिया सिं.सु.फॉ म्यु.ऑ.पो
लागणीच्या वेळी 40 85 85 87 531 १४२
लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी 160 34 7
लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी 40 87
मोठ्या बांधणीच्या वेळी 160 85 85 347 531 १४२
एकूण 400 170 170 868 1062 २८२

 

विद्राव्य खतांचा वापर:

  • ठिबक सिंचनाने खते दिल्यास खतांची कार्यक्षमता ९० टक्क्यापर्यंत वाढते, तर प्रचलित पध्दतीत ३५ ते ४० टक्के खते उपयोगी पडतात.
  • ऊसाच्या लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते.
  • नत्रासाठी युरिया, स्फुरदयुक्त खते देण्यासाठी फॉस्फरिक आम्ल किंवा १२:६१:०० या खतांचा वापर करावा.
  • पालाश खतांच्या वापरासाठी पांढरे पोटॅशियम क्लोराईड वापरावे. त्याशिवाय पाण्यात विरघळणाऱ्या मिश्र खतात १९:१९:१९,२०:२०:२०, २०:०९:२०, १५:०४:१५ तर द्रवरुप खतात ४:२:८, ६:३:६, ६:४:१०, १२:२:६, ९:१:६ अशा विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत. ही खते प्रमाणबध्द व शिफारसीप्रमाणे वापरावीत.

अशाच हवामान अपडेट, दररोजचे ताजे शेतमाल बाजारभाव आणि सर्व शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रो क्रांती व्हाट्सअँप ग्रुपला जोडले जा👇

https://chat.whatsapp.com/FC6SR2CnOvV0ZuKJvhy6ut

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com