अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस : विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात येलो अलर्ट

अवकाळी पाऊस : विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात येलो अलर्ट

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत हवामानात बरेच बदल झाले आहेत. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. आठवड्याच्या शेवटी राज्यात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्या आला आहे. गेल्या दोन दिवसातही राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

कुठे येलो, तर कुठे ऑरेंज अलर्ट

काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया आणि यवतमाळसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही ठिकाणी कडक ऊन 

काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा मध्ये तुरळक ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आयएमडीने जारी केला उष्णतेच्या लाटेचा इशारा

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्य आणि देशातील तापमानात वाढ होत आहे. विदर्भातील काही भागातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस रात्रीच्या वेळी उकाडा वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. पुढील 24 तास तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com