निंबोळी अर्कासाठी निंबोळ्यांचे योग्य वाळवण व साठवणूक कशी करावी? जाणून घ्या सविस्तर

निंबोळी अर्कासाठी निंबोळ्यांचे योग्य वाळवण व साठवणूक कशी करावी? जाणून घ्या सविस्तर

निंबोळी अर्कासाठी निंबोळ्यांचे योग्य वाळवण व साठवणूक कशी करावी? जाणून घ्या सविस्तर

 

खरीप हंगाम तसेच इतर अनेक पिकांवरील किडींचे जैविक व्यवस्थापन करण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी कडूनिंबाच्या झाडांना निंबोळ्या लागलेल्या असून, या निंबोळ्या योग्य वेळी गोळा करून साठवणूक केल्यास त्या पुढे कीड व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयोगी पडतात.

 

पर्यावरणपूरक व खर्चिक बचतीचा उपाय – निंबोळी अर्क
निंबोळी अर्काचा उपयोग केल्यास रासायनिक किटकनाशकांवरील अवलंबित्व कमी होते. यामुळे उत्पादन खर्चात बचत होते आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. शिवाय रासायनिक औषधांमुळे नष्ट होणारे मित्र किटक वाचतात आणि नैसर्गिक कीड व्यवस्थापन होऊ शकते.

 

कडूनिंब – एक बहुउपयोगी वृक्ष
महाराष्ट्रात कडूनिंब सहज आढळतो. या वृक्षाचा प्रत्येक भाग औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात या वृक्षाचे विशेष महत्त्व आहे. कडूनिंबाच्या फळांपासून मिळणाऱ्या निंबोळ्यांचा वापर करून तयार होणाऱ्या अर्काने रासायनिक किटकनाशकांना पर्याय मिळतो.

 

निंबोळ्या कशा गोळा कराव्यात?
• कडूनिंब झाडाला वर्षातून एकदाच फळधारणा होते.

• झाडाच्या फांद्या हलवल्या असता निंबोळ्या जमिनीवर गळतात.

• पिकलेल्या पिवळसर निंबोळ्या झाडाखाली सड्याप्रमाणे दिसतात.

• या निंबोळ्या हाताने गोळा कराव्यात.

• गोळा करताना काडी-कचरा वेगळा करावा.

 

निंबोळ्या वाळविण्याची योग्य पद्धत
• निंबोळ्या कोरड्या व हवेशीर जागी, उन्हात पसरून ठेवा.

• शक्य असल्यास पातळ थरात वाळवाव्यात जेणेकरून निंबोळ्या सारख्या वळतात.

• अर्धवट वाळलेल्या निंबोळ्यांना बुरशी लागू शकते, त्यामुळे पूर्ण वाळविणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात वाळवत असताना, पावसाची शक्यता असल्यास लगेच घरात हलवाव्यात.

 

निंबोळ्या साठवण्याची काळजी

• निंबोळ्या वाळविल्यानंतर योग्य प्रकारे साठवणे अत्यंत गरजेचे आहे.

• हवेशीर पोती किंवा टोपल्यामध्ये साठवाव्यात.

• प्लास्टिकच्या हवाबंद पिशव्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये साठवू नये. यामुळे बुरशीचा धोका वाढतो.

 

निंबोळी अर्काचा वापर केल्याने आपले पीक सुरक्षित राहते, खर्च कमी होतो आणि पर्यावरणसुद्धा संरक्षित राहते. त्यामुळे वेळेत निंबोळ्या गोळा करून, योग्य वाळवण आणि साठवणूक करून त्यांचा प्रभावी उपयोग करणे हे प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करावे.

 

हे पण वाचा : कांदा साठवणुकीतील सामान्य रोग आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय

 

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com