आंबा पिकविण्याची योग्य पद्धत
आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीने फळे पिकविल्यास रंगाचा आकर्षकपणा मिळवितानाच चांगला स्वादही मिळतो.
- एसी रूम मध्ये आणि ऊन लागत असेल त्या ठिकाणी आंबा ठेवू नये.
- घरा मध्ये खेळती हवा असेल तिकडे आंबे ठेवावे.
- जमनीवर गोणपाट ठेवून त्यावर गवत घालावे आणि त्यावर आंबे ठेवावे आणि त्यावर परत गवत टाकून पातळ चादर किंवा गोणपाट टाकावे.
- दर 4 दिवसांनी आंबे बघावे आणि पिकलेले काढून आस्वाद घ्यावा.
- चुकून एखादा आंबा खराब होत असल्यास लगेच बाजूला काढावा.