आजचा कृषी सल्ला : खरीप हंगाम भाग 3
सोयाबीन पीक :
- सोयाबीन पिकाचे क्षेत्र हे झपाट्याने वाढत असून याचे मुख्य कारण म्हणजे सोयाबीन पिकावर चालणारे प्रक्रिया उद्योग आहेत
- कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे जर कोणते नगदी पीक असेल तर ते आता सोयाबीन आहे अशी ओळख आता सोयाबीन पिकाने निर्माण केली आहे
सोयाबीन पिकात उत्पादन कमी येण्याचे काही कारणे ते जर आपण दूर केली तर आपले उत्पादन हे नक्कीच वाढते ते कारणे कोणती ते आपण पाहुयात
- योग्य वाणाची निवड न करणे.
- वाण निवड केल्यावर त्याची उगवण क्षमता तपासून न पाहणे
- सुधारित तंत्रज्ञानचा अवलंब न करणे
- अन्नद्रव्ये व्यवस्थापन न करणे
- एकात्मिक किड व्यवस्थापन न करणे
- बीज प्रक्रिया न करणे.
या समस्या जर आपण सोडविल्या तर आपले सोयाबीन उत्पादन हे नक्कीच वाढेल.