स्लरी वापरण्याची योग्य पद्धत

जिवाणू स्लरी तयार करण्याची व वापरण्याची अचूक पद्धत

जिवाणू स्लरी तयार करण्याची व वापरण्याची अचूक पद्धत जाणून घ्या.

जिवाणू स्लरीसाठी लागणारे साहित्य –
२०० लिटर पाणी, एक टाकी, 2 किलो दम्ममटी , 2 लिटर ताक, 2 किलो काळा गूळ, 2 लिटर गोमूत्र.

कृती –
• २०० लिटर पाण्यामध्ये 2 किलो दम्ममटी, 2 लिटर ताक, 2 किलो काळा गूळ, 2 लिटर गोमूत्र मिसळून घ्यावे व हे मिश्रण १-२ दिवस भिजून द्या.
• तयार मिश्रण दिवसातून ३ वेळी चांगले ढवळून घ्यावे.
• २ ते ३ दिवसांमध्ये जिवाणू स्लरी तयार होते.

स्लरी वापरण्याची योग्य पद्धत –
• तयार झालेली २०० लिटर स्लरी ठिबकद्वारे एक एकर क्षेत्रातील पिकाला सोडावी.
• भाजीपाला पीक असेल तर २० ते २५ दिवसांनी २०० लिटर स्लरी एकरी सोडू शकतो.
• संपूर्ण पीक कालावधीमध्ये २ ते ३ वेळा स्लरीचा वापर केल्यास अत्यंत फायद्याचे ठरते.
• ऊस किंवा फळपिकांना एक ते दीड महिन्यांनी एकरी २०० लिटर स्लरीचा वापर करावा.

जिवाणू स्लरीचे फायदे –
• जमिनीतील हानिकारक बुरशी नष्ट करते.
• जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढविते.
• सेंद्रिय कर्ब वाढतो.
• जमिनीची सुपीकता वाढते.
• पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते.
• पिकांची जोमदार वाढ होते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
• रासायनिक खतावरील खर्चात कपात होते.
• अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
• जमिनीतील बुरशी नष्ट झाल्याने मर, कूज, सड या रोगांपासून पिकाचे संरक्षण होते.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com