आजचे कापूस, कांदा, सोयाबीन, हळद बाजारभाव कसे राहिले? पहा सविस्तर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर पुन्हा एकदा 12 डॉलरवर पोहोचली आहे. तर सोयापेंड ३३९ डाॅलरच्या दरम्यान होते. सोयातेलाच्या वायद्यांमध्येही सुधारणा दिसून आली होती. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून त्यात सुधारणा होताना दिसत नाही. देशाच्या बाजारपेठेतही प्रक्रिया प्रकल्पांच्या किंमती वाढत आहेत.
तर बाजार समित्यांमधील भावापतळी स्थिर दिसते. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे व्यवहार ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पार पडत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे टिकल्यानंतर देशातील बाजारातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत ९२.५६ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोचले होते. देशातील बाजारातही कापूस भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत.
बाजारातील आवक कमी कमी होत आहे. त्यामुळे भावही टिकून आहे. सध्या कापसाची सरासरी किंमत 7,300 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान आहे. पुढील काही दिवस बाजारपेठ अस्थिर राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
देशात उत्पादन कमी असूनही गेल्या काही आठवड्यांपासून मक्याचे बाजार स्थिर आहे. सध्या देशात मक्याला चांगली मागणी आहे. इथेनाॅलसाठी यंदा मक्याला चांगला उठाव मिळत आहे. कुक्कुटपालन आणि स्टार्च उद्योगाकडूनही मागणी आहे.
बाजारही स्थिर आहे. सध्या मक्याची किंमत 2,000 ते 2,300 रुपयांच्या दरम्यान आहे. मका बाजारातील तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, मका भावाची ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते.
सरकारने तूरीच्या भावावर आपली पकड मजबूत केली आहे. तूर बाजारात तेजी येऊ नये यासाठी सरकार काळजी घेत आहे. त्यामुळे तुरीचे दर स्थिर आहे, तुरीला प्रतिक्विंटल सरासरी 9,000 ते 9,700 रुपये प्रति क्विंटल आहे.
दुसरीकडे बाजारातील आवक स्थिर आहे. तरीही बाजारभाव स्थिर आहेत. तूर बाजारातील व्यापार्यांनी सांगितले की, बाजार आणखी काही आठवडे अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
बाजारात वाढत्या आवकेसह लसणीच्या भावातही थोडीशी नरमाई दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांत लसणाचे दर प्रति क्विंटल 20 ते 30 टक्क्यांनी घसरले आहेत. किरकोळ बाजारातही कांद्याचे दर घसरले आहेत.
सध्या बाजारात लसणाला प्रतिक्विंटल सरासरी किंमत 9 हजार ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल आहे. येत्या काही दिवसांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.