हरभरा आणि गव्हाचे उत्पादन दुप्पट! या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

हरभरा आणि गव्हाचे उत्पादन दुप्पट! या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

हरभरा आणि गव्हाचे उत्पादन दुप्पट! या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

 

राज्यात सध्या सर्वत्र हरभरा व गव्हाचे पीक जोमदार वाढीच्या, फुलोरा किंवा पक्वतेच्या अवस्थेत आहे.
या अवस्थांमध्ये पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण व खताची फवारणी याकडे लक्ष दिले तर चांगले उत्पादन मिळविणे शक्य होते.

 

“हरभरा पिकाच्या उत्पादनवाढीच्या महत्त्वाच्या बाबी”

• हरभरा पिकाच्या फांद्या फुटणे व घाटे भरणे या पाणी देण्याच्या महत्त्वाच्या अवस्था असून जास्तीचे पाणी उपलब्ध असेल तर ते पाणी फुलोऱ्याच्या काळात हरभरा पिकास द्यावे.
• तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास हरभऱ्याची चांगली वाढ होते. मात्र फुलोऱ्याच्या काळात तुषारने पाणी देऊ नये कारण त्यामुळे काही प्रमाणात फुलोरा झडतो. तेवढ्या काळात प्रचलित पध्दतीने हरभरा पिकास पाणी द्यावे.
• हरभरा पिकावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी हेलिओकील २० मि.ली. १० लिटर पाण्यातून फुलोरा ते घाटे भरण्याच्या काळात दोन वेळा फवारावे.
• फुलोरा ते घाटे भरताना पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) खताची प्रत्येकी १% (१० लिटर पाण्यात १०० ग्रॅम) अशा २ फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात.

 

“गहू पिकाच्या उत्पादनवाढीच्या महत्त्वाच्या बाबी”
• गव्हाच्या मुकुटमुळे फुटण्याची अवस्था, कांडी धरण्याची अवस्था, फुलोरा, दाणे चिकात असताना व दाणे भरण्याची अवस्था या पाणी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या संवेदनक्षम अवस्था आहेत.
• त्यासाठी गहू पिकास २१ दिवसाच्या अंतराने जमिनीच्या प्रकारानुसार ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
• गव्हावरील तांबेरा व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ३० ग्रॅम मॅकोझेब किंवा २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
• गहू पिकावर पेरणीनंतर ५५ व ७० दिवसांनी २ % (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) १९:१९:१९ हे खत फवारल्याने गव्हाच्या दाण्यावर चकाकी येते तसेच दाण्यांच्या वजनात वाढ होते.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com