हळद काढणीला सुरुवात; पुढील १५ दिवस महत्त्वाचे!
देशात २ लाख ७० हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. जून ते ऑक्टोबरअखेर पावसाचा आणि रोगाच्या प्रादुर्भावाचा फटका हळद पिकाला बसला. त्यातूनही निसर्गाच्या संकटातूनही शेतकऱ्यांनी हळदीचे पीक चांगले साधले आहे. अति पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळदीचे उत्पादन पंधरा टक्क्यांनी घटणार आहे. सध्या सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यांतील हळद काढणीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे.
हळदीची मागणी असल्याने उठावही होत आहे. हंगामाच्या प्रारंभीच हळदीला सरासरी १५,३०० हजार ते १६,४०० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. सध्या हळद काढणी सुरू असली तरी, काढणीला गती आली नाही. त्यामुळे बाजारात हळदीची आवक जेमतेमच आहे. येत्या आठवड्यापासून हळद काढणीला गती येईल. त्यानंतर अर्थातच पंधरा दिवसांनी हळदीची आवक वाढणार आहे.
दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यासह तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांतील हळद काढणी फेब्रुवारी अखेरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या बाजारपेठांत मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळद विक्रीस येण्याचा अंदाज हळद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दर टिकून राहण्याची शक्यता
प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रति क्विंटलमध्ये)
प्रत १ (अंगठी) १६१०० ते १६९००
प्रत २ १४३०० ते १४८००
गड्डा ११८०० ते १२८००
कणी १३३०० ते १४०००