हरभरा पिकाची लागवड आणि मर रोगावर उपाय योजना

हरभरा पिकाची लागवड आणि मर रोगावर उपाययोजना…

 

हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक आहे. जालना जिल्ह्यामध्ये यंदा सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने हरभरा पीक लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सन २०२३-२४ मध्ये हरभरा पिकाची ८४ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज सांगण्यात येत आहे.

मागील काही वर्षांमध्ये हरभरा पिकाच्या उत्पादनात घट झाली होती. याचे मुख्य कारण हरभरा पिकावर पडणारा मर रोग असल्याचे सांगण्यात येते.

हा रोग फ्युजारियम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमिनीमधून आणि बियाणाद्वारे होतो. ही बुरशी झाडाच्या अन्नद्रव्य वहन करणाऱ्या पेशीला मारते आणि जवळपास सहा वर्षांपर्यंत जमिनीमध्ये जिवंत राहू शकते.

या रोगामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनात ३० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होते.

ही आहेत मर रोगाची लक्षणे:

  • रोप अवस्थेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकून वाळतात, रोगग्रस्त झाडांचा जमिनीवरचा भाग, देठ व पाने सुकतात.

रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्या फवारणी आवश्यक:

  • पेरणीपूर्वी बियाण्याला बायोमिक्स १० मिली किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर एक एकर क्षेत्रासाठी ४ लिटर बायोमिक्स शेण खतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून शेतामध्ये टाकावे. रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बायोमिक्स १०० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • तसेच रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बायोमिक्स २०० मिली किंवा प्रोपिकोनाझोल २५ टक्के, ई. सी. (टिल्ट) १५ ग्रॅम किंवा टेबुकोना झोल ५० टक्के, ट्रायक्लॉक्सिस्ट्रॉबीन २५ टक्के, डब्ल्यु, जी. (नेटिवो) ७ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाझोल ५ टक्के ई. सी. (कॉन्टाफ प्लस) ७ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाइल ७० टक्के, डब्लू, पी. (रोको) १५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यामध्ये घोळून फवारणी करावी.

अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जोडले जा

https://chat.whatsapp.com/LicS8Fu6gePAvHjO3WeBo9

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com