चुनखडीयुक्त जमीन: पिकांच्या वाढीवर होणारे अनपेक्षित परिणाम!

चुनखडीयुक्त जमीन: पिकांच्या वाढीवर होणारे अनपेक्षित परिणाम!

चुनखडीयुक्त जमीन: पिकांच्या वाढीवर होणारे अनपेक्षित परिणाम!

 

जमिनीत जर चुनखडीचे आणि आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. तसच पिकाला अन्नद्रव्य पुरवठा होण्यास अडचणी येतात.
महाराष्ट्रात कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी आढळतात. विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता, कोरडे हवामान, कमी पाऊस, तसच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात विखुरलेले दिसून येते.

 

वेड्यावाकड्या खड्यांच्या स्वरूपात आणि भुकटी स्वरूपात असे जमिनीत मुक्त चुन्याचे दोन प्रकार आढळून येतात. अशा जमिनी चुन्यामुळे पांढऱ्या, भुरकट रंगाच्या दिसून येतात. खड्याच्या स्वरूपात असलेल्या चुन्यापेक्षा भुकटी स्वरूपातील चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो.

 

सिंचन क्षेत्रात हलक्या जमिनीत मुक्त चुन्याचे कण जमिनीच्या वरच्या थराखालील मुरमाच्या थरात जाऊन साठतात, तर चोपण जमिनीत म्हणजे ८.५ पेक्षा जास्त सामू असलेल्या जमिनीतील खालच्या थरात चुनखडीचे थर दिसून येतात. यालाच शेतकरी शेड किंवा शाडू लागला असे म्हणतात. असे चुनखडीचे थर जमिनीतील एक मीटरच्या आत दिसून आल्यास अशी जमीन फळबाग लागवडीसाठी योग्य नसते.

 

अशा जमिनीत फळबागेचे आयुष्य कमी राहते. उत्पादकता कमी होते. म्हणून फळबागेच्या लागवडीसाठी खड्डे करताना मातीच्या थरांकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवाव. चुनखडीचे थर १५ सेंमी पेक्षा जास्त रुंदीचे व एक मीटरच्या आत साठलेले नसावेत. अशा जमिनीत फळबाग लागवड यशस्वी होत नाही.

 

जमिनीत जर चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर जमिनीचा रंग भुरकट पांढरा दिसून येतो. जमिनीची घनताही वाढते. म्हणजेच जमिनीची घडण कडक बनते. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. जमिनीतील मातीचा सामू विम्लधर्मीय म्हणजेच सामू ८.० पेक्षा जास्त, तर क्षारांचं प्रमाण कमी असत. हे माती परिक्षणावरुन लक्षात येतं.

 

मातीत मुक्त चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असत. हेच प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पिकांना आणि फळपिकांनाही हानिकारक ठरत. जमिनीतील उपलब्ध मुख्य अन्नद्रव्यांची म्हणजेच नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. तसच उपलब्ध दुय्यम अन्नद्रव्यांची म्हणजेच मॅग्नेशिअम, गंधकाची उपलब्धताही कमी होते. लोह, जस्त, बोरॉन यासारख्या उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. जमिनीच लोहाची कमतरता निर्माण झाल्यामुळे पिकांची पाने पिवळी पडून शिरा हिरव्या राहतात.

 

हीच पाने पुढे पिवळी पडतात आणि नंतर वाळतात. अशा जमिनीत घेतलेल्या पिकांची वाढ खुंटते. यालाच इंग्रजीमध्ये ‘लाइम इन्ड्यूस क्लोरोसिस’ अस म्हणतात. शेतकरी याला ‘केवडा पडला’ असही म्हणतात. कोरडवाहू क्षेत्रात गावातील गावठाण जागेत अशा पांढऱ्या चुनखडीयुक्त जमिनी आढळून येतात. चुनखडीयुक्त जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने वाळवी, हुमणी, सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com