झुकीनी शेतीचे रहस्य: या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
दिवसेंदिवस आता भारतातही मोठ्या प्रमाणावर परदेशी भाजीपाला पिकांची लागवड केली जाऊ लागली आहे. ज्यामध्ये लेट्यूस, झुकीनी, मायक्रोग्रीन, रोमन, रॉकेट, ब्रोकोली, आईसबर्ग, थाईम, लीक या पिकांचा सामावेश होतो. तर यातील अनेक भाज्या आपण जेवनासोबत सलँड म्हणून वापरतो. यातीलच झुकीनी पीक हे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरत आहे.
झुकीनी हे पीक काकडीसारखे दिसणारे आणि भोपळ्यासारखी चव असणारे पीक आहे. पिवळ्या रंगाची आणि हिख्या रंगाची झुकीनी असे दोन प्रकार यामध्ये असतात. हे पीक लागवडीनंतर केवळ ४५ दिवसांत काढणीला येते. काकडीपेक्षा मोठे आणि दुधी भोपळ्यापेक्षा लहान आकाराचे हे फळ असते.
झुकीनीच्या एका फळाचे वजन हे २०० ते ३०० ग्रॅमपर्यंत असते. तर एका झाडाला १० ते १२ फळे लागत असून एका झाडापासून २ ते ३ किलो फळे आपल्याला मिळू शकतात. याप्रकारे या पिकातून एका हेक्टरमध्ये ४० टनापर्यंत उत्पन्न मिळते. या फळभाजीची विक्री ही मॉलमध्ये आणि सुपर मार्केटमध्ये केली जाते.
दरम्यान, झुकीनीला मार्केटनुसार दर मिळतो. सर्वसाधारणपणे ४० ते ५० रूपये किलोप्रमाणे झुकीनीची विक्री केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन ते अडीच महिन्याच्या काळात लाखोंचा नफा देणारे हे पीक आहे. झुकीनी ही लो कॅलरी असलेलं पीक आहे. त्यासोबतच लो-शुगर असलेलं हे पीक असून हे शरिरासाठी फायद्याचे असलेले पीक आहे.
हे पण वाचा : कांदा काढणी व साठवणीदरम्यान वजन घट होऊ नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स