बिजप्रक्रियेचे फायदे
- जमिनीतुन व बियाणाद्वारे पसरणारया रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
- बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
- रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
- कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मकउपाय करून पेरणी करता येते.
जिवाणु संवर्धकाची बिजप्रकिया
२५० ग्रॅम जीवाणु सवर्धकाचे पाकिट १० ते १५ किलो बियाण्यास वापरावे १ लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गुळ टाकुन द्रावण तयार करावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जीवाणु संवर्धन टाकुन बियाण्यास हळुवारपणे लावावे किंवा जीवाणु संवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात बसेल व बियाण्यांचा पृष्ठभाग (साल) खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे ओलसर करुन जीवाणू संवर्धन करणारे जिवाणू बियाण्यास चोळावेत नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे. अशी बिजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी ताबडतोब करावी त्यामुळे जमिनीतुन सेंद्रीय पदार्थ कुजवून जमीन सुधारण्यास मदत होते.
जीवाणू संवर्धन बिज प्रक्रियेबाबतची काय दक्षता घ्यावी
- जीवाणू संवर्धन प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांची प्रकिया केल्यानंतर करण्यात यावी.
- जीवाणु सवर्धके लावण्यापुर्वी जर बियाण्यास किटकनाशकाचे, बुरशीनाशके, जंतुनाशकाचे इ. लावलेले असतील तर जीवाणु संवर्धन नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावावे.
- रायझोबियम जीवाणु संवर्धनाची प्रक्रिया पाकीटावर नमुद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गट समुहास करावी (एकदल, द्विदल, व व्यापारी पिके).
- ट्रायकोडर्मा जैविक बुरशिनाशक सोबत रायझोबियम अझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणु या जीवाणु संवर्धकाची बिजप्रक्रिया करता येते.