pmkisan

PM किसानचा 17 वा हप्ता कधी? जाणून घ्या सविस्तर 

शेतकऱ्यांसाठी (Farmers) सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार (Central Govt) विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम करते. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून सरकार वर्षभरात शेतकऱ्यांना हप्त्या हप्त्याने 6000 रुपये देते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहे. आता लवकरच 17 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, हा हप्ता जमा होण्यापूर्वी तुम्हीला तीन महत्वाची कामे करावी लागतील, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल.
रकारनं शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेचे आत्तापर्यंत 16 वा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 17 वा हप्ता येण्यापूर्वी, तुमच्यासाठी काही महत्वाची कामे आहेत, ती तुम्हाला पूर्ण करावी लागतील.

हप्ता मिळण्यापूर्वी ‘ही’ तीन कामे पूर्ण करा

1) ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पडताळणी केली नाही ते पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन हे करु शकतात. ई-केवायसी पूर्ण केली असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा तुम्हाला 17 वा हप्ता मिळणार नाही.

2) तसेच तुम्हाला जमिनीची पडताळणी करणेही आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचा 17 वा हप्ता अडकू शकतो. यासाठी तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयात जाऊ शकता.

3) बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे, नोंदणी फॉर्ममध्ये बरोबर माहिती भरणे या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. अन्यथा 17 वा हप्ता मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

कधी जमा होणार PM किसानचा 17 वा हप्ता?

पंतप्रधान किसान योजनेचा पुढचा हफ्ता आपल्या खात्यावर केव्हा जमा होईल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता जून महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान निधी योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

रवर्षी शेतकऱ्यांना मिळते 6000 रुपयांची मदत 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या  माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत केली जाते. यामध्ये चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नव्हती, ते शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

अशाच माहितीसाठी ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 

ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com