उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज
राज्यातील अनेक भागात उष्णचा चटका वाढला. तर काही ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसही राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला
हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर उद्या ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे
तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर जिल्ह्यात उष्ण रात्रीचा अंदाज आहे. तसेच मराठवड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर काही ठिकाणी उष्ण रात्रीचा अंदाज आहे.
तसेच विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला.
तर राज्याच्या बहुतांशी भागात उन्हाचा चटका कायम राहू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तर उद्यापासून राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला.