निर्यात

केळी-आंब्यासह या 20 पिकांची निर्यात वाढणार, जाणून घ्या सविस्तर… 

केळी-आंब्यासह या 20 पिकांची निर्यात वाढणार, जाणून घ्या सविस्तर… 

कृषी उत्पादनांच्या निर्यातीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार केळी आणि आंब्यासह 20 पिकांच्या निर्यातीत वाढ करणार आहे.

कृषी क्षेत्रात नवे बदल होत आहेत. शेतकरी नवीन जातींचा प्रयोग करत आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. कृषी उत्पादनांच्या निर्यातीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार केळी आणि आंब्यासह 20 पिकांच्या निर्यातीत वाढ करणार आहे. कृषी उत्पादनांची निर्यात दुप्पट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी कृषी आराखडा तयार करण्यात येत आहे. दरम्यान, याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. तर याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची चांगली किंमत मिळेल.

कृषी निर्यात वाढवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार कृषी निर्यात वाढवण्याचा विचार करत आहे. यासाठी 20 कृषी उत्पादनांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी कृषी आराखडा तयार करण्यात येत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यामध्ये नियमन नसलेल्या उत्पादनांचा समावेश करण्यात आलाय. APEDA च्या मते, या 20 उत्पादनांची निर्यात क्षमता 56.7 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनांना अधिकचा दर मिळून फायदा होणार आहे. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी शेतमालाच्या निर्यातीच्या संदर्भातील माहिती दिलीय. येत्या तीन ते चार महिन्यात यासंदर्भातील कृषी आराखडा तयार केला जाणार आहे. सध्याचा विचार केला जागतिक निर्यातीत भाराताचा वाटा जास्त नाही. जगाच्या तुलनेत भाराताचा निर्यातीचा वाटा  2.5 टक्के आहे. त्यामुळं हा वाटा चार ते पाच टक्के करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  

निर्यातीत कोणत्या पिकांचा समावेश केला जाईल?

कृषी मालाच्या निर्यातीत मोठी वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जागतिक उत्पादनात भारताची निर्यात वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, द्राक्षे, डाळिंब, टरबूज, पेरू, हिरवी मिरची, शिमला मिरची, भेंडी, लसूण, कांदा, शेंगदाणे, काजू, गूळ, नैसर्गिक मध आणि तूप यांचा समावेश आहे. दरम्यान, सध्या निर्यातीच्या संदर्भातील कृती आराखड्यावर काम सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होऊन निर्यात सुरु होण्याची शक्यता आहे. पुढील चार महिन्यात यासंदर्भातील आराखड्याचे काम पूर्ण होणार आहे. 

भारतीय उत्पादनांना मोठी मागणी आहे.

दरम्यान, सध्या जगभरात भारतीय कृषी उत्पादनांना मोठी मागणी आहे. उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार वेगाने कृती योजना तयार करत आहे. अमेरिका, मलेशिया, कॅनडा, रशिया, जर्मनी, फ्रान्स, कोरिया, चीन, इंडोनेशिया, जपान, इटली, बेल्जियम आणि ब्रिटनला मोठ्या प्रमाणात शेती मालाची निर्यात केली जाते.

 

आजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी खालील लिंकवर जा 

agrokranti.com/bajarbhav/

 

अशाच माहितीसाठी ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 

ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com