Unseasonal rain and thundershowers are also forecast in the state

राज्यात अवकाळी पावसासह आणि मेघगर्जनेचाही अंदाज

राज्यात अवकाळी पावसासह आणि मेघगर्जनेचाही अंदाज

दोन दिवस राज्यातील हवामानात बरेच बदल होतील. काही भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ काही भागांत दिसणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. दुसरीकडे, राज्यातील लोक उन्हामुळे तापत आहेत, दरम्यान, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

पुणे वेधशाळेने आज आणि उद्या राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

दोन दिवस राज्याच्या वातावरणात अनेक बदल दिसून येतील. काही भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. शहरात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ काही भागांत दिसणार आहे. यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होईल.

अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस

शुक्रवारी रात्री विजेच्या कडकडाटासह अमरावती विभागात मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे गहू, संत्रा, कांद्यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे अमरावतीत नागरिकांची आणि शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अवेळी होत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आले आहे.

सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. शेतातील काढून ठेवलेले पीक पावसामुळे खराब होण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली. एकीकडे दुष्काळी परस्थितीमुळे पाणी नाही तर दुसरीकडे अवकाळी पाऊस होत आहे. काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, आंबा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात पाऊस

बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील लोणार, सिंदखेड राजा, मेहकर आणि साखर खर्डा भागात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. यामुळे या परिसरातील भाजीपाला पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा तसेच कांदा बियाणे पिकांचे मोठं नुकसान झाले. या भागात मुसळधार पावसामुळे आंब्याच्या पिकांचे नुकसान झाल्याची बातमी अली आहे. तर साखर खर्डा परिसरात ही वादळी वाऱ्यामुळे सवडत येथील घरावरील टीनपत्र उडालीय आहे. अनेक घरांची पडझड झालीय आहे.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com