यंदा कापसाचे जागतिक उत्पादन वाढण्याचा युएसडीएचा अंदाज 

यंदा कापसाचे जागतिक उत्पादन वाढण्याचा युएसडीएचा अंदाज 

यंदा कापसाचे जागतिक उत्पादन वाढण्याचा युएसडीएचा अंदाज 

Kapus Bajarbhav : देशातील अनेक बाजारपेठांमध्ये कापसाचा कमाल भाव आता 8 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याच वेळी, सरासरी किंमत पातळी 7,300 रुपयांवरून 7,800 रुपयांपर्यंत वाढली. बाजारात कापसाचा पुरवठा दिवसागणिक कमी होत आहे. दुसरीकडे, युएसडीएने नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजात अनपेक्षित खुलासे केले. युएसडीएने भारताच्या कापूस उत्पादन आणि वापराच्या अंदाजात वाढ केली आहे. त्याच वेळी, भारताच्या निर्यातीचा अंदाजही  चांगलाच वाढवला. 

देशातील कापसाचा पुरवठा दिवसागणिक कमी होत आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, आजही देशात 80 हजारांपेक्षा कमी गाठी आल्या आहेत. सध्या बाजारात दर स्थिर आहेत. काही भागात याची किंमत 7,800 रुपयांपर्यंत आहे. मात्र अनेक ठिकाणी अजूनही 7,500 रुपयांपेक्षा कमी किंमत आहे. सध्या कापसाची किंमत गुणवत्ता आणि आवकेवर अवलंबून असते. सध्या अनेक बाजारपेठांमध्ये कापसाची कमाल किंमत 8 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु सरकारी भावपातळी 7,300 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान आहे.

हे ही पहा : आजचे कापूस बाजारभाव

 

दुसरीकडे, सर्वांचे लक्ष युएसडीएच्या अहवालाकडे होते. कापसाच्या वाढत्या किंमतींमुळे, युएसडीएने अधिक उत्पादन वाढीचा अंदाज वर्तवला तर त्याचा बाजारावर अधिक परिणाम होईल अशी भीती होती. परंतु युएसडीएने जागतिक उत्पादन आणि वापराबाबतचा आपला अंदाजही वाढवला. भारताच्या कापूस उत्पादनाच्या अंदाजातही 6 लाख गाठींची वाढ केली आहे. त्याच वेळी, वापराच्या अंदाजात 4 लाख गाठींची वाढ झाली. मात्र, निर्यातीच्या अंदाजात व्हनगळीच वाढ झाली. यावर्षी भारताची निर्यात 26 लाख गाठींवर पोहोचेल असा अंदाज यूएसडीएने वर्तवला आहे.

यूएसडीएने देखील जागतिक उत्पादनात किंचित वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कापसाचा वापरही वाढण्याची अपेक्षा आहे. पुढील हंगामासाठी शिल्लक साठा कमी राहील असेही यूएसडीएने स्पष्ट केले. अमेरिकचे उत्पादन आणि साठ्यांचा अंदाज कमी करण्यात आला. यूएसडीएच्या अंदाजामुळे अमेरिकन बाजारावरही काहीसा परिणाम झाला. आज जेव्हा बाजार सुरू झाला, तेव्हा पहिल्या सत्रात बाजारात घसरण झाली. मात्र, त्यानंतर बाजार सावरला आहे.

आज सायंकाळपर्यंत इंटकाॅन्टीनेंटल एक्सचेंजवर म्हणजेच अमेरिकेच्या बाजारात कापसाचे वायदे एक टक्क्याने वाढून ९६.२५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. म्हणजेच १७ हजार ५६० रुपये प्रतिक्विंटल भाव होतो. तर देशातील वायदे ६२ हजार ९०० रुपये प्रतिखंडी म्हणजेच १७ हजार ६०० रुपये होता. तर प्रत्यक्ष खरेदीचे भावही टिकून होते. मार्च महिन्यात कापसाची किंमत सरासरी 8 हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळे कापूस बाजारातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना कापूस विकताना बाजारपेठेतील चढ-उतारांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. 

अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 

ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com